We have Plan and Strategy for you to WIN the ELECTION.
#PoliticalWazir हे राजकीय निवडणूक क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. राजकीय निवडणुकीच्या युद्धात, निवडणूक जिंकण्यासाठी सुरु केलेली “मोहीम” सर्वात मोठ काम करते.
#PoliticalWazir हे राजकीय निवडणूक क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. राजकीय निवडणुकीच्या युद्धात, निवडणूक जिंकण्यासाठी सुरु केलेली “मोहीम” सर्वात मोठ काम करते. या युद्धाचा “मोहीम” म्हणजे आत्मा (गाभा – Base) आहे. जिच्याशिवाय निवडणूक शक्यच नाही.
आज सर्व भारतीय जनता शैक्षणिक बाबतीत सुजाण व जबाबदार झाली आहे. त्यामुळे एखादा उमेदवार फक्त त्याच्या जात, धर्म, पंथ किंवा पैसा वा दहशतीच्या (Muscle Power) भरवशावर निवडून येईल असे मुळीच नाही. त्यासाठी तुम्हाला नवीन कल्पनांची गरज भासेल. अश्या कल्पना ज्या मतदारांना आकर्षित करू शकतील. ह्या सर्वांची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला नवीन योजना व धोरण ठरवावे लागतील. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मतदारसंघाची, त्या मतदार संघातील मतदारांचा
कल, त्यांचे विचार तसेच तुमची छबी, तुमच्याबद्दल लोकांच्या मनात काय भावना आहेत ह्या सर्वांची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे आणि तेसुद्धा वेळेच्या पहिले धोरण ठरवण्यासाठी. आणि हे सर्व योजना व धोरण ठरवण्यासाठी, तसेच त्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला एखाद्या जबरदस्त अनुभव असणाऱ्या निवडणूक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची निवड करावी लागेल, जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी ग्राउंडपासून तर तंत्रज्ञान क्षेत्रापर्यंत तुम्हाला पूर्णपणे मदत करतील. आणि या सर्वांचा पुरेपूर फायदा तुम्हाला देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. ग्रामपंचायत पासून तर महाराष्ट्राच्या प्रमुख नेतृत्त्वापर्यंत, आम्ही आजपर्यंत सर्वच पक्षांच्या उमेदवारांची कामे केलेली आहेत आणि करत आहोत. त्या सर्व कामांचा अनुभव व व्यवस्थापनाच्या जोरावर आपली मोहीम फत्ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.