परकीय सत्ताधीशांच्या अत्याचाराने ग्रस्त झालेल्या भारत भुमीला रायगडावर राज्यभिषेक करून प्रतिइंद्र छत्रपती होत थोरले स्वामी शिवाजी महाराजांनी मुक्त केले आणि मराठ्यांच्या प्रचंड इतिहास ची उद्दंड लिखाणाला नव्याने सुरुवात झाली .
महाराष्ट्र ते कर्नाटक, आंध्रप्रदेश पासून श्रीलंका पर्यंत स्वराज्याची सिमा वाढली..
पण हनुमान जन्मोत्सवाला ( ३ एप्रिल १६८०) ला दख्खनपतींनी स्वराज्याचा निरोप घेतला आणि महाराष्ट्रावर आपल्या आशिर्वादाचे वर्षाव करून छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी झाले…
परकीय रक्तपिपासुंच्या डोक्यात स्वराज्य संपवण्यासाठी डाव आखायला सुरुवात झाली.. सोबतच स्वकीय सुद्धा स्वराज्य पोखरून काढण्यासाठी वारूळ उभे करायला लागली आणि स्वराज्य संपवण्यासाठी स्वप्न बघणार्या डोक्यावर वज्रघात करत खास्या महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती शिवछत्रपतींचा वारसा सामर्थ्याने पुढे चालवण्यासाठी बत्तीस मण सुवर्णसिहासनपती पुढे आले ,
दिल्लीपतीच्या छातीवर रौद्रभीषण तांडव करण्यासाठी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज दख्खन तख्तावर बसले…
बुरहाणपुर वर जाऊन खासा मोघल बादशहा शहेनशहा औरंगजेब चीच दाढी ओढली आणि खासा औरंगजेब या तेवीस वर्षाच्या छत्रपतींना संपवण्यासाठी महाराष्ट्रात उतरला..
आणि सुरू झाली इतिहासाने कधीच न बघितलेली झुंज हसनअलिखान , शहाबुद्दीन, फत्तेखान, मुअज्जम ,आज्जम , रणमस्तखान , पोर्तुगीज, सिद्दी सर्वांच्याच तोंडचे पाणी या तेवीस वर्षाच्या पोराने पळवले .
खासा आलमगीर म्हणवणाऱ्या औरंगजेब ला आपल्या डोक्यावरचा ताज ए हिंद किमांश फेकून द्यावा लागला..
एक एक गड सहा सहा वर्षे झुंझायला लागला , खवळलेल्या समुद्राला आणि फुटलेल्या बांधाला सुद्धा या रौद्रशंभुच्या घोड्याच्या टापाखाली यावं लागलं ,
आंध्रप्रदेश, बिहार, बंगाल च्या मातीलाही मराठ्यांच्या शौर्याची धडकी भरली , जिवन म्हणजे पेटतं रणांगण
आणि
जिवन तर जिवन मृत्यू ला सुद्धा आमचा राजा असा पुढे गेला की शत्रू ला सुद्धा थरकाप उडाला..
चाळीस दिवस मरणयातना सहन करत असतांना सुद्धा आपली मान खाली घालण्यासाठी तयार न होता धीरोदात्तपणे मरण स्विकारलं आणि मराठा साम्राज्याच्या रक्तात शौर्याचं धग पेटवून हिंदुस्थान वर राज्य करण्याचं स्वप्न जिवंत केलं.
पण कलमकसायांनी ज्याच्या शौर्याला आपसूकच पुसण्यासाठी हळुवारपणे शाईचे पाणी फेकले…
ज्याच्या बुद्धिमत्तेवर ते शौर्यावर प्रश्न उपस्थित केले , ज्याला नादात नादान असलेला सांगितले…
गेली शतके पार होऊन सुद्धा ज्यांच्या इतिहास ला लोकसमक्ष आणण्यासाठी वा.सी बेंद्रे, कमल गोखले, विजयराव देशमुख सारख्या इतिहास कारांना झगडावं लागलं…
ज्याचा इतिहास हाच एक जाज्वल्य अग्नी प्रमाणे आहे…ज्याचं चरित्र हे गंगेच्या निर्मळ पाण्याप्रमाणे आहे आणि ज्याचं योद्धापण रूद्रशिवाचा तांडव आहे..
अश्या छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास आता पुढे येऊन सुद्धा आम्ही आमच्या राजाला काय दिले नेमके?
छत्रपती संभाजी महाराज यांना अजूनही महाराष्ट्राध्ये शासकीय महापुरुषांच्या यादीत स्थान नाही , त्यांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय नाही.
सरकार वर सरकार पालटले पण ती यादी जैसे थेच आहे.
आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर करु शकत नाही.
महाराष्ट्र शासनाच्या महापुरुषांच्या दिनविशेष यादी मध्ये शंभुराजेंचं नाव नाही.
फडणवीस काळात माननीय दिनदयाल उपाध्याय यांचे नाव शासकीय दिनविशेष यादीमध्ये आले ,
या वर्षी नव्याने आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचे नाही.
नेमके काय कारण आहे या राज्यकर्त्यांपुढे ? नेमकी समस्या काय आहे की एवढे वर्षे पालटुन सुद्धा शंभु छत्रपतींना शासकीय महापुरुषांच्या यादीत स्थान दिल्या गेले नाही.
का हा दुजाभाव आमच्याच राजाबद्दल आमच्याच स्वराज्यात.?
नेमकी शंभुछत्रपतींना खरी मानवंदना कधी?
✍️अक्षय चंदेल ©
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद
- गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता
- प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?
- रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir