मंडळी सम्पूर्ण महाराष्ट्रभरातील जसजशा महानगरपालिका निवडणूका जवळ येत आहे. तसतस राजकीय वातावरण आणखी पेटत चाललं आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना कारागृहात टाकण्याची भाषा करत आहेत ,तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत भारतीय जनता पक्षामधील नेत्यांना कारागृहात डाम्बण्याची भाषा करत आहे.
संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना भारतीय जनता पक्षाच्या साडे तीन नेत्यांचा उल्लेख केल्यानंतर भारतीय जनता पक्षामधील नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.
किरीट सोमय्या यांना शिवसैनिकाकडून झालेल्या मारहाणीचा भारतीय जनता पक्षाने जागोजागी कडाडून विरोध केला होता. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले फडणवीस?
संजय राऊत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या मुद्द्यावर बोलत असताना फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. गेली दोन वर्षे ही मंडळी सातत्याने अशाच प्रकारच्या धमक्या देत आहेत. भाजपा संघर्षात कधीही मागे हटलेली नाही.
अस देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलंय. तसेच भाजप संघर्षाला तयार असल्याचं म्हणत त्यांनी राऊत यांना आव्हान दिलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले गेली दोन वर्षे अशा प्रकारच्या धमक्या ही मंडळी सातत्याने देत आहेत. भाजपा संघर्षाला कधीही मागे हटलेली नाही.
पोलिसांचा उपयोग करून आमच्या नेत्यांना प्रचंड त्रास देण्यात आलाय. त्याची अनेक उदाहरण समोर आहेत. सातत्याने पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. आजची पत्रकार परिषदे ही शिवसेना नेत्यांवरील कारवाईचा विरोध करण्यासाठी घेण्यात आलेली आहे.
अस देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं. मात्र हे तापलेल राजकीय वातावरण आता कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.