सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची जामीन पूर्व याचिका फेटाळली आहे. नितेश राणे यांना अटकेपूर्वी सुप्रीम कोर्टाने १० दिवसांचा अवधी दिला आहे. अटक झाल्यानंतर नितेश राणे जामीनसाठी अर्ज करू शकतात अस कोर्टाने सांगितल आहे.
सिंधुदुर्ग येथील जिल्हा न्यायालयाने जामीन याचिका फेटाळून लावल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयातसुद्धा त्यांचा हातात काही आलं नाही. नितेश राणे यांनी योग्य कोर्टात आपली बाजू मांडावी असा सल्ला त्यावेळी उच्च न्यायालयाने नितेश राणे यांना दिला.
काय आहे नेमकं हल्ला प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला कणकवलीत जीवघेणा हल्ला झाला. दरम्यान मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीमध्ये अटक केली. आरोपी सचिन सातपुते याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांच नाव घेतल.
तेव्हापासून नितेश राणे यांच्या मानेवर पोलिसांची आणि शिवसेनेची कायद्याची तलवार फिरत आहे. हा हल्ला मतदारांवर दबाव आणण्यासाठी करण्यात आला होता आणि यामागील संपूर्ण षड्यंत्र नितेश राणे यांनी आखल होत असे पोलीस तपासादरम्यान स्पष्ट झालंय.
नितेश राणे यांच्याकडून जेष्ठ वकील मुकुल रोहतगी न्यायालयात आपली बाजू मांडत आहे तर राज्यसरकारकडून अभिषेक मनू सिंघवी हे आपली बाजू मांडत आहे. नितेश राणे आणि राज्यसरकारमधील हे वादग्रस्त प्रकरण कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडलवल्याचा सूड शिवसेना घेते आहे- जेष्ठ वकील मुकुल रोहतगी
मंडळी काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओ संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाचा सूड शिवसेना नितेश राणेंकडून घेते आहे असा दावा नितेश राणेंचे वकील मुकुल रोहतोगी यांनी केला आहे. मात्र हे प्रकरण हल्ला होण्याच्या आधीच आहे अस प्रतिउत्तर राज्यसरकारचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनीसुद्धा दिल आहे. आता हे वादवादीच प्रकरण कुठपर्यंत जातंय यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.