मंडळी नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याने ते राजकिय रणधुमाळीत चांगलेच चर्चेत आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी काही कालावधीपासून कठोर भूमिका घेतलेली आहे.
भाजप नेत्यांचा राजकरणातला भोंगळ कारभार पुढे आणेल आणि हा महाराष्ट्र भाजपमुक्त करेल. अस त्यांनी बरेचदा म्हटलं आहे. मोदी साहेबांची टीका केल्याकारणाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नाना पटोले यांचा पुतडा जागोजागी जाळून त्यांचा विरोध केला होता.
त्याकारणाने नाना पटोले जास्तच चर्चेत आले होते. मात्र आता नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर बोलत असतांना चांगलाच हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधत चांगलाच कडाडून विरोध व्यक्त केला आहे.
” महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर होतोय, हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही भाजपची सर्व काळी कृत्ये जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. भाजपाला महाराष्ट्रातील जनता त्यांची जागा दाखवेल. आज त्यांचा वेळ आहे पण वेळ बदलेल ना, हे काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत.”
अस म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नाना पटोले म्हणाले की
“महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी अनेकदा प्रलोभन आणि दबावतंत्राचा वापर झाला. हा खऱ्या अर्थाने मोठा आक्षेप आहे. कोणाच्या इमारती किती आहेत? कोणी काय केलं? हे सगळे भाजपावाले दुधाने धुतलेले आहेत अस तर नाही.”