सगळ्यांचे मुखवटे उतरवून जेलमध्ये पाठवणार- संजय राऊत

sanjay raut on kirit somayya
             मंडळी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत या दोघांमध्ये चांगलाच राजकीय वाद पेटला होता. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली होती.
 
 
त्यानंतर संजय राऊत यांनीसुद्धा शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यावर प्रतिहल्ला केला. त्यानंतर आज आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीन क्लीनचिट दिल्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या व भारतीय जनता पक्षावर चांगलीच टीका केली आहे.
 
 
प्रसार माध्यमांशी बोलत असतांना संजय राऊत म्हणाले की,
 
 
” पीएमसी घोटाळा, खंडणी यांसारखी अनेक प्रकरण आजपर्यंत दाबून ठेवण्यात आली होती. आता बरेच लोक समोर येऊ लागले आहेत. हळूहळू सर्वांना समजेल. ते जर निर्दोष आहेत, तर बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करत आहेत? जेव्हापासून मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, हे बाप-बेटे दारोदार या कोर्टामधून त्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करत आहेत. त्याची गरज तुम्हाला का पडतेय? यातच सगळं स्पष्ट होतंय. मी जे साडे तीन म्हणालो,  ते तुम्ही मोजत रहा.”
 
 
अस संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका करत म्हटलं आहे.
 
 

 

             पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की,
 
 

” त्या साडेतीन लोकांची नाव जाहीर केली, तर ते अटकपूर्व जामिनासाठी जातात. जसजशी त्यांना अटक होईल, तसतस तुम्हाला समजेल. पण माझे शब्द लिहून ठेवा, हे बाप-बेटे आणि इतरही काही लोक, जे मोठंमोठ्या गप्पा करतात, त्या सर्वांचे मुखवटे उतरवून त्यांना मी तुरुंगात टाकणार आहे.”

 
 
 
अस संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितल. संजय राऊत हे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सर्वात जास्त चर्चेत आलेलं नाव आहे. भारतीय जनता पक्षाशी त्यांची फारशी गटत नाही. मात्र आता केलेल्या विधानांनातर किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्ष संजय राऊत यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *