मंडळी दिनांक ३ मार्च २०२२ पासून अधिवेशनाला सुरवात झालेली असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राजकीय वातावरण चांगलाच तापलं होत. अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषद घेऊन महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर चांगलीच टीका केली होती.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. अधिवेशनाच्या सुरवातीला राज्यपाल यांच्या अभिभाषणादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याकारणाने राज्यपाल यांनी आपलं अभिभाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटोपत घेतलं.
त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करतांना भाजप नेत्यांची चांगलीच कान उघाडणी केली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या व आमदारांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या आधी माहाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर व त्यांच्या निकटवर्तीयांवर सुरू झालेले छापे पाहता विरोधीपक्ष भाजप आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट असल्याने सरकार त्यास कसे तोंड देणार हा प्रश्न महाविकास आघाडीच्या आमदारांना पडला आहे.
देशात सध्या अत्यंत घृणास्पद वातावरण सुरू असून एक विकृती फोफावत असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.
ठाकरे म्हणाले,
” आम्ही ३० वर्षे सापाच्या पिल्लाला दूध पाजले. तेच आता वळवळ करत आमच्यावरच फुत्कारत आहे. त्याला कसे ठेचायचे हे आम्हाला चांगले माहिती आहे”.