मंडळी रशिया आणि युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धाची चर्चा सद्ध्या सम्पूर्ण जगभरामध्ये सुरू आहे. मात्र याचा फायदा घेऊन भारतातील केंद्र सरकार भारतीय जनतेची लूट करण्याची शक्यता अनेक राजकीय नेत्यांनी दर्शवली आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर मागे १५ ते २२ रुपयांची वाढ होणार असल्याचे दिसत आहे. आज उत्तरप्रदेशात मतदानाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ही वाढ जाहीर होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीसुद्धा ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
“निवडणुका संपणार, सरकारचे खरे रूप दिसणार, इतके दिवस निपचित पडून असलेले पेट्रोल डिझेलचे दर अचानक उसळी घेणार! उणाचा भडका झालाय, तसाच इंधन दरवाढीचाही होणार!”
अस खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्यसरकारमध्ये राजकिय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले ओवेसी?
उत्तरप्रदेशात निवडणुका संपल्यानंतर इंधन दर वाढीचा भडका उडणार याची शक्यता दर्शवली जात आहे. यावर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीसुद्धा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ओवेसी यांनी इंधन दरवाढीबद्दल भाकीत केलं आहे.
” पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी गगनाला भिडत आहे. एक लक्षात ठेवा की ७ तारखेच्या रात्री किंवा १० तारखेला सकाळी तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसतील. हे भाव वाढतील आणि सांगतील की, युक्रेनमध्ये अस घडलंय, तसं घडलंय…काहीपण बोलतात. कारण तयार करतात की अस घडलं, तसं घडलं आणि भाजपाचे बिचारे भक्त म्हणतात की नाही नाही मोदीजीने योग्यच केलं. तुमच्या गाडीत पेट्रोल मोदी टाकतोय की, गरीब स्वतः पेट्रोल भरतोय.”