मंडळी गेल्या काही दिवसांपासून अधिवेशन महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेते भाजपच्या या मनसुब्याला पूर्ण होऊ देणार नाही. अशी ग्वाही देत आहे.
शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप यांच्यात मंगळवारी आरोपांची धुळवड रंगली. राज्य सरकारने भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. व्हिडिओच सादर केल्याने प्रतिउत्तर कसे द्यायचे यावर चर्चा सुरू झाली.
गृहमंत्री वळसे पाटील मुख्यमंत्र्यांशी व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच उत्तर देणार आहेत. या व्हिडीओमध्ये शरद पवारांचाही उल्लेख असून त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी प्रतिउत्तर देतांना फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले शरद पवार साहेब
रेकॉर्डिंग संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलत असतांना पवारांनी फडणवीसांच्या आरोपांना प्रतिउत्तर दिल आहे. ते म्हणाले की,
” माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं पण माझा काही संबंध नसल्याचं शरद पवारांनी यावेळी सांगितल. या प्रकरणाची राज्यसरकार सम्पूर्ण चौकशी करेल. त्याची सत्यता असत्यता तपासेल. त्यात माझही नाव घेतलेलं दिसत. माझं कधी यासंबंधात कुणाशी बोलणं व्हायचं काही कारण नाही. कधी काळी वर्ष सहा महिन्यानंतर देवेंद्र फडनवीसांच्या सहकाऱ्याबद्दल तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितलं यात सत्यता किती ते तुम्ही पाहा. तुमच्या सहकाऱ्याबाबतची ही तक्रार आहे.”
अस ते म्हणाले. तपास यंत्रणांचा वापर करुनही महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्नाला त्यांना यश येत नसल्याने फडणवीस यांनी ही टोकाची भूमिका घेतली. अस शरद पवार यावेळी म्हणाले. सरकारी अधिकाऱ्यांची १२५ तास रेकॉर्डिंग होते ही कौतुकास्पद बाब आहे. अस शरद पवार प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगत होते. मात्र पवारांच्या या प्रतिक्रियेवर फडणवीस काय प्रतिक्रिया देतील. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.