मंडळी महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असता संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र आता राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडी आणि भाजपवर टीका करत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. विरोधक म्हणतात, सत्ताधारी आम्हाला संपवायला निघालेत. सत्ताधारी म्हणतात विरोधक आम्हाला संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील समस्या आणि लोकांच्या प्रश्नांबाबत कोणालाच काही पडलेले नाही.
हे फक्त एकमेकांवर धाडी टाकण्यात रमलेले आहेत. लोकांना निवडणुका हव्या आहेत का, याचा जरा कानोसा घ्या, लोकांना निवडणूक नको आहे. महाविकास आघाडी सरकार व भारतीय जनता पक्ष जनतेला फसविण्याचा प्रयत्न करत आहेत. अस राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलतांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोश्यारी यांच्यावरसुद्धा राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली. शिवाजी महाराज, रामदास स्वामी हे कोण माहिती नसतांना, अभ्यास नसतांना बोलायचं कशाला?
शिवरायांनी केव्हा सांगितले नाही की रामदास माझे गुरू होते. मग काहीही बोलून भांडणे लावण्याचा उद्योग करायचा कशाला? महापुरुषांची बदनामी करून तरुणांची माथी भडकवायची बस एवढाच उद्योग सध्या राज्यात सुरू आहे. महापुरुषांना बदनाम करायचे आणि त्यांच्या नावावर मते मागायची, असा खेळ आहे.
अस बोलून राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान करून तरुणांची माथी भडकवायच काम केलं. अस राज ठाकरे यांचा म्हणणं आहे. त्याचबरोबर कोश्यारी यांनी विद्येची नायिका सावित्रीआई फुले यांच्याबद्दलपण वादग्रस्त विधान केल होत. अशाप्रकारचे बेताल वक्तव्य करून कोश्यारी मूर्खपणाचा डोंगर ओलांडत आहे. अस म्हणायला हकरत नाही.