मंडळी पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. मात्र पंजाबमध्ये त्यांना आम आदमी पार्टीकडून मोठा पराभव पत्करावा लागला आहे. भाजपचा पंजाबमध्ये झालेल्या पराभवावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
शिवसेनेला उत्तर प्रदेश आणि गोव्यात अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना चांगलच प्रतिउत्तर दिल आहे.
“भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. उत्तर प्रदेश त्यांचच राज्य होत, पण अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. समाजवादी पक्ष ४२ वरून १२५ वर गेला असून जागा तिप्पट वाढल्या आहेत. भाजपच्या विजयात ओवेसी आणि मायावतीचं योगदान आहेत. हे मान्य कराव लागेल. त्यामुळे त्यांना भारतरत्न द्यावा लागेल.”
अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी पुढे बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
ते म्हणाले की,
” लोकशाहीत विजय पराभव होत असतो. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजपचा विजय झाला यात आम्हाला दुःख होण्याच काही कारण नाही. तुमच्या आनंदात आम्हीदेखील सहभागी आहोत.”
अस संजय राऊत यांनी म्हटलं. पुढे बोलताना संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या माहनगरपालिका निवडणुकीबद्दल केलेला विधानाला प्रतिउत्तर देत म्हटलं की,
” या पाच राज्यांच्या निवडणुकीचा आणि महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचा काहीही संबंध नाही. गेली ५० वर्षे आम्ही महानगरपालिका लढत असून पालिकेवर आमचाच भगवा झेंडा कायम राहील.”