विरोधीपक्षांकडे नेतृत्व नाही म्हणून भाजप यशस्वी- सामना

saamna
मंडळी नुकत्याच पाच राज्यांतील पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पाचपैकी पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. मात्र पंजाबमध्ये त्यांना अत्यंत मोठा आणि लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपच्या याच विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेन पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधारी पक्षावर निशाणा साधलाय.
 
 
 
पाच राज्यांमधील निवडणुकीमधील भाजपाच्या विजयावर भाष्य करतांना शिवसेनेन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२४ चा संदर्भ देत केलेल्या भाषणापासून ते अगदी ओवेसीपर्यंत अनेक मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली आहे. भाजपला विजय कशामुळे मिळाला यासंदर्भात शिवसेनेनं भाष्य करतांना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
 
 
 
 
महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या गैरवागणुकीमुळे शिवसेनेन केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली आहे. 
 
 

शिवसेनेच्या सामनामध्ये नेमकं काय? 

 

 

 

          भारतीय जनता पक्षाच्या चार राज्यांमध्ये झालेल्या यशानंतर शिवसेनेनं सामना या अग्रलेखातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षात तगडे नेतृत्व नाही. त्याचा फायदा भाजपाला होत आहे. हे त्यांच्या विजयाचे सूत्र आहे. २०२४ पर्यंत असे एखादे सर्वसामान्य नेतृत्व लोकांनी तयार केले तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.
 
 
 
पंजाबमधील मतदानावर प्रभाव पडावा व भाजपाला फायदा व्हावा यासाठी खून, बलात्कार, लूटमार अशा आरोपांनी बरबटलेल्या बाबा राम रहीम यास ‘निवडणूक’ मोसमाच्या मुहूर्तावर पॅरोलवर सोडण्यात आले. तरीही पंजाबात भाजपाला हाती काहीच लागले नाही.
 
 
 
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच ‘हिजाबचा’ राष्ट्रीय बनवलेला मुद्दाही संपवला गेला आहे. दाऊद, पाकिस्तान आणि दहशतवाद हे मुद्दे आता अर्थहीन ठरलेले असून २०२४ च्या निवडणुकीपूर्व हे सर्व मुद्दे जिवंत केले जातील.
 
 
 
भारतीय जनता पक्ष हे निवडणुकीच्या वेळेला हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून मत घेण्याच्या हेतूने इथल्या सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांच्यासोबत गैरव्यवहार करत असतात. त्यामुळे भाजप नेत्यांनी कितीही ओरडू ओरडू सांगतीले की आम्ही विकासाच्या मुद्यांवर मत घेतली, तर अशा भाकडकथांना अर्थ नाही. अस शिवसेनेच्या सामना या अग्रलेखात लिहिलेलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *