मंडळी राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त मुंबई येथे केलेल्या भाषणामध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावायला सांगितल्याने महाराष्ट्रातलं संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि त्यामाध्यमातून जनतेची मतं काबीज करण्यासाठी राज ठाकरेंचा हा खटाटोप पाहून सम्पूर्ण महाराष्ट्रात त्यांची टीका केली जात आहे.
राज ठाकरे यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भोंगे लावलेले आहेत. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या कृत्यातून महाराष्ट्राची सामाजीक तेढ निर्माण होण्याची धोका नाकारता येत नाही. मात्र या सर्व गोष्टींचा काही एक विचार न करता राज साहेब आपल्या मतावर ठाम आहे.
राजसाहेबांच्या या कृत्याचा विरोध संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डीमध्ये झालेल्या एका सभेमध्ये राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उचलेल्या हनुमान चाळीसाच्या वादावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डीमध्ये बोलत असताना त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ते म्हणाले की,
“काही लोक समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचे कामं करतात. कित्येक वर्ष लोक एकमेकांना गुण्यागोविंदाने साथ देत आहेत, जातीय सलोखा ठेवला आहे, जातींमध्ये तेढ निर्माण होऊ देत नाही. पण काही पक्षाचे नेते अस करा इथं हा भोंगा लावा तिथं तो भोंगा लावा सांगत आहेत. अरे भाषण करणं सोपं आहेरे बाबा. पण त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक आम्हाला निवडून यायचं आहे आणि हे काय सांगू लागले आहेत. कोणाला तरी बर वाटण्यासाठी , निवडणूकीवर डोळा ठेवण्यासाठी अशा प्रकारची भाषण हे फुले शाहू आंबेकरांच्या विचारांच्या लोकांना पटणारी नाहीत. चिथावणीखोर भाषण करून लोकांचे प्रश्न मिटणार आहे काय?”
असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी राज ठाकरे यांची चांगलीच कानउघाडणी केली.