मंडळी गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये भाजपविरुद्ध महाविकास आघाडी सरकार अस राजकीय युद्ध आपण बघत आहोत. महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ईडी आणि संजय राऊत यांच्यामध्ये संशयित घमासान सुरू होत. याआधी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर आता थेट संजय राऊत यांच्यावर ईडीने आपला हल्ला चढवला आहे.
संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी आपली बाजू मांडत म्हटलं की,
” कुठली प्रॉपर्टी ? आम्ही घरचे खूप श्रीमंत लोक आहोत का ? आम्ही स्वतः केलेल्या मेहनतीमधून ही मालमत्ता उभी केली आहे.”
संजय राऊत यांच्या या विधानाचा विरोध करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे त्यांनी भाजपवर टीका केली होती. याच प्रतिउत्तर देताना आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना आव्हान केल आहे. ते म्हणाले की,
” एक पैशाचाही घोटाळा केला म्हणून संजय राऊत यांना बाजूला होता येणार नाही. घोटाळा केला नसेल तर त्यांनी न्यायालयातून ते सिद्ध करावे.”
अस चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना आव्हान केलं आहे. मात्र आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.