मंडळी महाराष्ट्रातल्या राजकारण तापण्याचा वेग आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे राज ठाकरे यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिल्याचा वाद मिटलाच नाही, तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक नावाच्या ठिकाणी हल्ला केल्याने राजकीय वातावरण आणखीच चिघळल आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीयकरणासाठी आंदोलन चालू आहे. जवळपास १२० एसटी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये आत्महत्या केल्या. मात्र राज्यसरकारला अध्यपही जाग आलेली नाही. या सर्व गोष्टींचा राग मनात धरून काल एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक नावाच्या घरावर दगड फेक करत आंदोलन केल.
मात्र या हल्ल्यामागचा मास्टर माईंड कोण आहे. याचा पोलीस प्रशासन शोध घेत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेचा निषेध करत अकोल्यामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केल आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी ?
एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर केलेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड भाजप आहे. असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भाजपने भडकवण्याचं काम केलं आहे. असा पण त्यांनी आरोप केला आहे.
याप्रकरणी १०७ आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणवंत सदावर्ते यांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी अटक केलेली आहे. मात्र या सर्व घटनेमागचा मास्टर माईंड कोण? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.