एसटी कर्मचाऱ्यांची सदावर्तेकडून फसवणूक

Fraud by ST employees

मंडळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दगडफेक करून हल्ला केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाच महाराष्ट्र शासनामध्ये विलीनकरणं व्हावं यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे.

 

या आंदोलनामध्ये जवळपास १२० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी महाराष्ट्र सरकारला जाग आलेली नाही. महाराष्ट्र सरकारचा हा नाकर्तेपणा एसटी कर्मचाऱ्यांच्या सहन करण्याच्या आवाक्याबाहेर गेल्या कारणाने कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली. या प्रकरणी न्यायालयाने १०९ कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

मात्र सगळ्यात मोठा ट्विस्ट एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर आला आहे. ही दंगल पेटवण्यामागे मास्टर माईंड सदावर्तेच होते. अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल एका एसटी कर्मचाऱ्याने मोठा खुलासा केला आहे. 

 

सदावर्ते आणि गुजर यांनी फसवणूक केली

 

मंडळी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते आणि अजयकुमार गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे लुटून फसवणूक केल्याचं स्वारगेट आगारातील एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी सांगितलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी सांगितलं की,

 

‘ गुणरत्न सदावर्ते आणि अजयकुमार गुजर यांनी निलंबित कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५४० रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये अशी १ लाख १० हजार रुपयांची रक्कम २५० डेपोमधून गोळा केली.”

 

अस एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं.सदावर्ते यांची पोलीस प्रशासन चौकशी करत आहे. या प्रकरणाचे धागे दोरे कुठपर्यंत आहे याचीसुद्धा चौकशी पोलीस प्रशासन करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *