मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये घेतलेल्या सभेत अप्रत्यक्षपणे सांगितल की, ते आगामी निवडणूका भारतीय जनता पक्षासोबत लढणार आहेत. मात्र काल बोलत असताना बऱ्याचदा राज ठाकरेंची जीभ घसरली.
ठाकरे साहेबांच्या बोलण्यात मोदींसाहेबांप्रमाणे काही तथ्य दिसलं नाही. सर्व तिर काल ते हवेमध्ये उडवायचा प्रयत्न करत होते. गुडीपाडव्यानिमित्त आधी घेतलेल्या सभेमध्ये भोंग्याच्या वादावरुन त्यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच काम केलं.
त्यावेळी एकही मुद्दा त्यांनी सामान्य जनतेच्या समस्सेचा घेतला नाही. मात्र काल झालेल्या सभेत बऱ्याच लोकांची अपेक्षा होती की, राज ठाकरे यावेळी तरी रोजगार, शिक्षण, शेती याविषयी बोलतील .
मात्र राजसाहेब यांनी ते नेहमीचच हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि इतर पक्षावर टीका केली. यासोबतच राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरसुद्धा बोचरी टीका केल्याने आव्हाड यांनी राज ठाकरेंना सडेतोड उत्तर दिलं आहे.
आव्हाड यांचं राज ठाकरेंना प्रतिउत्तर
मंडळी काल ठाण्यात झालेल्या मनसेच्या सभेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोचरी टीका केल्याने आव्हाड आणि राज ठाकरे या दोघांमध्ये चांगलच राजकीय युद्ध रंगल आहे. राज ठाकरे यांनी आव्हाड यांच्यावर टीका करताना म्हटलं की,
” जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा नागसारखा आहे. ये इकडे शेपूट धरून गरगर फिरवतो आणि फेकून देतो.”
अशी राज ठाकरे यांनी केलेली अपमानजनक टीका ऐकल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा राज ठाकरे यांची प्रतिउत्तर देताना चांगलीच कानउघाडणी केली. आव्हाड म्हणाले की,
” राज ठाकरे यांनी आपला चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा हे आरशात तपासून पाहावे. तशा स्टँड अप कॉमेडीयनच्या भरपूर जागा खाली आहेत. त्यांनी त्यामध्ये जावं.”
अस आव्हाड यांनी म्हटलं आहे. मात्र आता हे रंगलेल राजकीय युद्ध कुठल्या वळणावर जाईल. याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.