मंडळी सध्या भारतीय देशामध्ये नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लिमांचा वाद निर्माण करण्याचा चौफेर राजकारण काही संघटना आणि पक्षांकडून होत आहे. अलीकडे गाजलेला ‘ द कश्मीर फाईल्स हा चित्रपट चांगलच वादाच कारण बनला होता.
संपूर्ण देशामध्ये या चित्रपटाने हिंदू मुस्लिम चर्चेचा डंका वाजवला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कश्मीरी पंडितांच्या बाजूने भूमिका घेतली होती. मात्र ती भूमिका फक्त हिंदूंच्या मनात संभ्रम निर्माण करणारी होती.
मोहन भागवंत यांच्या याच भूमिकेवरून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मोहन भागवत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की,
” मोहन भागवत यांना जर अखंड भारत करायचा असेल तर, त्यांना मी आठवण देऊ इच्छितो की जेव्हा आपण सत्तेत नसतो तेव्हा आपल्याला वचनं द्यायचे असतात आणि जेव्हा सत्तेत असतो तेव्हा ते वचनं पूर्ण करायचे असतात. आता तुमचेच लोक सत्तेत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा वचन पूर्ण करायचं आहे. जे कश्मीरी पंडित गेल्या ७ वर्षांपासून पुनर्वसनासाठी हक्क मागत आहे. त्यांचं एका महिन्यामध्ये पुनर्वसन करून द्याव आणि किमान एक रात्र तरी आपण एखाद्या कश्मीरमधल्या गावामध्ये मुक्काम करून दाखवावा. हेच अखंड भारताचा पाहिलं पाऊल असेल.”
असा टोला प्रवीण तोगडिया यांनी मोहन भागवत यांच्यावर लगावला.
तोगडियांचा भाजप आणि राज ठाकरेंनासुद्धा टोला
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भोंग्याच्या वादावरून आपलं मत व्यक्त करताना राज ठाकरे आणि भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की,
” ज्या राज्यात भाजपाच सरकार आहे त्या राज्यात भोंगे उतरवण्याचे आदेश का बरं दिले जात नाही. जर तुम्हाला भोंगे उतरवायचे असेल तर ४८ तासांच्या आत भोंगे उतरवायचे असतील तर सुप्रीम कोर्टाकडून पोलीस प्रशासनाला आदेश द्यायला लावा. मी नाव घेणार नाही. पण हिंदूचा अचानक पुडका आलेल्या व्यक्तींच मी स्वागत करतो.”
अस त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हटलं.