मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणांनी धुमाकूळ घातलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेहमी विरोधात बोलणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपाच्या बाजूने भूमिका मांडल्याने त्यांनी सर्वांना अचंबित करून सोडलं आहे.
भारतीय जनता पक्षाच राजकारण हे नेहमी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून मत मिळवायचं असत आणि आता तोच डावपेच राज ठाकरे यांनी वापरायला सुरवात केली आहे. १ मे २०२२ ला राज ठाकरेंची सभा औरंगाबादमध्ये होणार असून समाजामध्ये धार्मिक अस्थिरतेच वातावरण पसरण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील मुस्लिम समाजाचे नेते अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधुन शिवसेनेची भूमिका मांडली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की,
” अलीकडे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना आपण भाजपाची B टीम समजत होतो. मात्र आता राज ठाकरे यांच्या भाजपप्रेरीत भूमिकेवरून त्यांना भाजपाची C टीम म्हटलं तर वावग ठरणार नाही.”
अस अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या सभेचा शिवसेनेला फरक पडत नाही – अब्दुल सत्तार
दिनांक १ मे २०२२ ला औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलत असताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटलं की,
” शिवसेना हा खरा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि तो इतर धर्मांनासुद्धा सोबत घेऊन चालतो. शिवसेना हा प्रत्येक माणसाच्या, गोरगरीब जनतेच्या काळजात बसलेला पक्ष आहे. म्हणून राज ठाकरे यांच्या सभेचा शिवसेनेच्या कुठल्याच कार्यकर्त्यावर काही प्रभाव होणार नाही किंवा इतर लोकांना त्याचा फरक पडणार नाही.”
अस अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.