मंडळी महाराष्ट्रातील राजकारणात सध्या राजकीय नेत्यांनी एकमेकांची टिंगल उडवण्याचा चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई आणि ठाणे येथे घेतलेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा हा नागसारखा दिसतो असे सांगून त्यांची नक्कल करून चेष्टा केली होती.
प्रतिउत्तरात प्रसार माध्यमांशी बोलतांना आव्हाड यांनीसुद्धा राज ठाकरेंवर टीका करत म्हटलं होतं की,
” राज ठाकरेंनी एकदा आरशात बघून पहावं , की त्यांचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा दिसतोय ते.”
यावरून संपूर्ण राजकीय क्षेत्रात चांगलीच राजकीय रंगत लोकांना बघायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर सांगलीमधल्या इस्लामपूरमध्ये काल घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना चांगलच धारेवर धरलं.
राज ठाकरे यांनी मस्जिदींवरील भोंगे खाली न उतरवल्यास प्रत्येक मस्जिदीपुढे दुप्पट आवाजात भोंग्यावर हनुमान चालीसा लावा असे आदेश आपल्या मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले होते. याच मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत म्हटलं की,
” राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाला मिळालेला नवीन भोंगा आहे. जो अंगानेसुद्धा भोंगा आहे. राज ठाकरे यांनी भाजपकडे आपला मेंदू गुलाम म्हणून ठेवला आहे. मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याची अक्कल राज ठाकरेंना देवाने दिली नाही.”
अस बोलताना राज ठाकरेंच्या राजकीय गुलामीची खिल्ली मिटकरी यांनी उडवली.
राज ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी सुरक्षा कशाला हवी? – मिटकरी
राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये राज ठाकरेंवर जोरदार टीका करतांना म्हटलं की,
” रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. एक राम दशरथ का बेटा एक राम घटघटमे बैठा अस म्हटल्या जाणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांनी अयोध्येला जातांना आपली गादीही भरताला दिली होती. ते Z+ सुरक्षा घेऊन गेलेलं नव्हते. तोच खरा राम भक्त जो केंद्राची Z+ सुरक्षा नाकारणार. “
अस बोलतांना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंची चांगलीच कानउघाडणी केली. मात्र १ मे ला होणाऱ्या औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे मिटकरींना काय प्रतिउत्तर देतील? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.