मंडळी गेल्या सात वर्षांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीन अगदी कमी कालावधीमध्ये दिल्ली आणि पंजाब राज्यांसारखे गड काबीज केले. याहीव्यतिरिक्त गोव्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्येसुद्धा आम आदमी पार्टी चे दोन आमदार निवडून आले.
कुठल्याही जाती धर्माच राजकारण सोडून विकासाच राजकारण करणारा हा पक्ष आता महाराष्ट्रामध्ये उदयास यायला सुरुवात झालेली आहे. याच उदाहरण नुकतंच बघायला मिळालं आहे.दिनांक २३ व २४ एप्रिल २०२२ ला उदगीर येथे ९५ वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन पार पडणार आहे.
या पार्श्वभूमीवर अन्यायाविरुद्ध, अनिष्ट प्रथा परंपरेविरुद्ध बंड पुकारणार विचारपीठ या साहित्य संमेलनात सर्वांना आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देत असत. या साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित असणार आहेत.
शरद पवार यांनी विचारपीठावर बोलत असतांना राज ठाकरेंच्या समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भोंग्याचा उल्लेख करावा. अस पत्र आम आदमी पार्टीच्या वतीने शरद पवार यांना देण्यात आल आहे.
शरद पवारांसोबत नागराज मंजुळे आणि रविषकुमार यांची असणार उपस्थिती
दिनांक २३ व २४ एप्रिलला होऊ घातलेल्या ९५ व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाला शरद पवार यांच्यासोबत बहुजनांचे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न चित्रपटाच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेपुढे मांडणारे विख्यात सिने दिग्दर्शक सैराट फेम नागराज मंजुळे आणि निर्भीडपणे आपली ठाम भूमिका मांडणारे विख्यात पत्रकार रविषकुमार यांची उपस्थिती असणार आहे.मात्र या साहित्य संमेलनामध्ये आपल्या भाषणात शरद पवार काय भूमिका मांडतील? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.