मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरेंच्या भोंग्यानंतर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. दिनांक १९ एप्रिल २०२२ ला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अमोल मिटकरी नी मांडलेल्या भूमिकेबद्दल राजकीय वातावरण चिघळल आहे.
अमोल मिटकरींनी या सभेमध्ये बोलत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलच धारेवर धरलं. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेचा उल्लेख करत त्यांनी राजकीय चर्चा आणखी रंगात आणली.
पुरंदरेची हाड मोजायला लावू नका – जितेंद्र आव्हाड
राज ठाकरे हे भोंग्याच्या वादावरून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करत आहे. अशी ठाम भूमिका अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणातून मांडली. मात्र पुढे बोलत असतांना त्यांनी केलेल्या वक्त्यव्यावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अमोल मिटकरी यांनी बोलत असतांना,
‘ मम भार्या समर्पयामि ‘
हा लग्न समारंभामध्ये वापरण्यात येणारा मंत्र सांगून त्याचा अर्थ
‘ माझी बायको घेऊन जा ‘
असा सांगितला. ही गोष्ट ब्राम्हण महासंघाला चांगलीच खटकली आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापुढे त्यांनी अमोल मिटकरींविरोधात आंदोलन सुरू केलं.
राज ठाकरे अंगाने मोठा भोंगा – अमोल मिटकरी
आंदोलनकर्त्यांची मिटकरींसमोर ततबब
अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथे वापरलेल्या मंत्रावरून आंदोलन करणाऱ्या ब्राह्मण महासंघासाची प्रसार माध्यमांवर चर्चा झाली तेव्हा अमोल मिटकरींनी चुकीचा मंत्र वापरून हिंदू धर्माचा अपमान केला अस आंदोलकांच म्हणन होत. मात्र जेव्हा मिटकरींनी या मंत्राचा अर्थ ब्राह्मण महासंघाला विचारला, तेव्हा मात्र खुल्या प्रसार माध्यमांवर ब्राम्हण महासंघाची ततबब झाली.
या पार्श्वभूमीवर
” पुण्यामध्ये चालू असलेलं ब्राम्हण महासंघाच आंदोलन निरर्थक आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी बाबासाहेब पुरंदरेंनी केली होती, तेव्हा ब्राम्हण महासंघाने का आंदोलन केलं नाही ?”
असा प्रश्न मिटकरी यांनी आंदोलकांना विचारला. मात्र आता हे चालू असलेलं आंदोलन कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- लालपरीची सुटका पण गाढवाला कुणी पाळलं – सामना
- शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र
- राज ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे- धनंजय मुंडे
- पुरंदरेची हाड मोजायला लावू नका – जितेंद्र आव्हाड
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir