अमोल मिटकरींना अजित पवारांची ताकीद

अमोल मिटकरी

मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरेंच्या भोंग्यानंतर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. दिनांक १९ एप्रिल २०२२ ला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अमोल मिटकरींनी मांडलेल्या भूमिकेबद्दल राजकीय वातावरण चिघळल आहे.

अमोल मिटकरींनी या सभेमध्ये बोलत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलच धारेवर धरलं. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेचा उल्लेख करत त्यांनी राजकीय चर्चा आणखी रंगात आणल.

पुरंदरेची हाड मोजायला लावू नका – जितेंद्र आव्हाड

राज ठाकरे हे भोंग्याच्या वादावरून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करत आहे. अशी ठाम भूमिका अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणातून मांडली. मात्र पुढे बोलत असतांना त्यांनी केलेल्या वक्त्यव्यावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

अमोल मिटकरी यांनी बोलत असतांना, ‘ मम भार्या समर्पयामि ‘ हा लग्न समारंभामध्ये वापरण्यात येणारा मंत्र सांगून त्याचा अर्थ ‘ माझी बायको घेऊन जा ‘ असा सांगितला. ब्राम्हण महसंघाने मिटकरींनी हिंदू धर्माचा अपमान केला सांगत त्यांच्या विरोधात मोर्चा उभा केला आहे.

अमोल मिटकरींनी वापरलेल्या मंत्रावरून ब्राम्हण महासंघाच आंदोलन

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना अमोल मिटकरींच्या वक्त्यव्यंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की,

“माझं स्वतःच नेहमी स्पष्ट मत असत तुम्हा सगळ्या मीडियाला माहिती आहे ,की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने वक्त्यव्य करत असताना कुणाच्या धार्मिक भावनेचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.”

अस स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. 

काय म्हणाले जयंत पाटील? 

अमोल मिटकरींनी इस्लामपूरमधील सभेमध्ये केलेल्या वक्त्यव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं की,

” ब्राम्हण समाज हा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. इस्लामपूरमध्ये मिटकरींच्या भाषणातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी गैरसमज करून घेऊ नये.”

अस मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *