राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत

संजय राऊत

मंडळी राणा दाम्पत्याने शिवसेनेला आव्हान केलं आहे, की आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीसमोर वाचल्याशिवाय अमरावतीला परत जाणार नाही. या अनुषंगाने खासदार नवनवीन राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईत दाखल झाले आहे. ते मुंबईत दाखल होताच संपूर्ण मुंबईतील शिवसैनिक आक्रमक होऊन राणा दाम्पत्याच्या घराला वेढा देऊन बसले आहेत.

 

राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना

 

राणा दाम्पत्याने अमरावतीला परत जावे अन्यथा हात पाय तोडून परत पाठवू अस आव्हान शिवसैनिकांनी त्यांना केलं आहे. त्याकरिता शिवसैनिकांनी रुग्णवाहिकासुद्धा राणा दाम्पत्याच्या निस्वासस्थानी आणली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्या म्हणाल्या की,

 

” माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे, की त्यांनी महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायला हवं. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बिनकामी फुल पगारी आहे. आमच्या कुटुंबाव्यक्तीरक्त अपार्टमेंटमध्ये इतर लोकसुद्धा राहतात. मात्र शिवसेनेने आपले गुंड या ठिकाणी आम्हाला त्रास देण्यासाठी पाठवलेले आहेत. पण त्यांनी एक लक्षात ठेवावं आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही.”

 

अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. याच्या प्रतिउत्तरात सध्या नागपूर दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की,

 

” राणा दाम्पत्यांनी लायकीमध्ये रहावं. त्यांच्या अशा कामगिरीमुळे शिवसैनिकांचा उद्रेक उडेल. कुणाच्यातरी पाठबळाने तुम्ही जर मुंबईत येऊन मातोश्रीवर घुसत असला, तर शिवसैनिक काय स्वस्त बसतील? तुम्ही जर लक्ष्मण रेषा उलांडाल तर शिवसैनिकसुद्धा तुमच्या घरापर्यंत घुसतील.”

 

अस प्रतिउत्तर संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला दिल आहे. 

 

मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य

 

शिवसेनेला बच्चू कडूचा पाठिंबा

 

राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झाल आहे. मात्र महाराष्ट्राचे राज्यमंत्री व प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेनेची बाजू घेत राणा दाम्पत्याला चांगलच सुनावलं आहे. बच्चू कडू म्हणाले की,

 

” उध्दव ठाकरे आणि शिवसेना वाघ आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याने वाघाच्या बिळात हात टाकू नये.”

 

अस आव्हान त्यांनी राणा दाम्पत्याना केलं आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *