माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या

kirit somaiya sanjay raut

मंडळी महाराष्ट्रामध्ये एकीकडे राज ठाकरेंच्या भोंग्याच् राजकारण सुरू आहे, एकीकडे राणा दाम्पत्याच हनुमान चालीसा पठणाच राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या kirit somaiya आणि शिवसेनेमध्ये चांगलाच राजकीय खेळ रंगला आहे.

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या kirit somaiya  यांच्यावर मुंबईमधील खार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला होता. मात्र किरीट सोमय्या kirit somaiya यांनी या हल्ल्याचा मास्टर माईंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहे असा आरोप केला आहे.

आता अनिल परब आणि यशवंत जाधव यांचा नंबर- किरीट सोमय्या

हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी दिल्लीमध्ये केंद्रीयगृहसचिवांची भेट घेतली.  किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं की,

” ठाकरे सरकार पोलिसांच्या मदतीनं गुंडांकडून हल्ला करण्याच काम करत आहे. दिल्लीमधून महाराष्ट्रामध्ये स्पेशल टीम पाठवण्यात यावी. कारण सम्पूर्ण हल्ल्याचे फुटेज पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गायब केले आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे पदाचा गैरवापर करत आहे. पोलिसांच्या उपस्थित माझ्यावर हल्ला करण्यात आला. माझ्यावर कमांडोचासुद्धा हल्ला पोलीसांच्या समर्थनाने केल्या गेला.”

असा आरोप किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र सरकार व पोलीस प्रशासनावर केला आहे. 

आमचं सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही- संजय राऊत

महाराष्ट्रात नाही तर यूपीमध्ये राष्ट्रपती राजवट लावा – संजय राऊत 

मंडळी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचीवांची भेट घेत त्यांना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची विनंती केली. याच प्रतिउत्तर देतांना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला चांगलच धारेवर धरल आहे. ते म्हणाले की,

” एखाद्या व्यक्तीच थोडं रक्त निघालं तर तुम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी करता. राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर आधी उत्तर प्रदेशमध्ये लावा. कारण उत्तर प्रदेशमध्ये गेल्या ३ महिन्यांमध्ये १७ बलात्कार झाले आहेत.”

असा टोला संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

FB : PoliticalWazir.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *