शरद पवार एसटी कर्मचाऱ्यांचे २ हजार कोटी गिळंकृत करण्याच्या बेतात पडळकरांचा खुलासा

शरद पवार

मंडळी महाराष्ट्रातील राजकरणामधले मातम्बर मानले जाणारे शरद पवार यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांबद्दल निर्दयी वृत्ती दाखवण्याचा आरोप सध्या भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. जवळपास १२० एसटी कर्मचारी मृत्युमुखी पडले असतानासुद्धा शरद पवार यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कसल्याही प्रकारची मदत केलेली नाही.

 

नुकत्याच घोषित झालेल्या एसटी बँकेच्या निवडणूकीत जो थकबाकीदार आहे त्याला मतदान करता येणार नाही असा आदेश महाविकास आघाडी सरकारन काढला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोचरी टीका करत त्यांना चांगलच धारेवर धरलं आहे.

 

शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र

 

प्रसार माध्यमांशी बोलत असतांना पडळकर म्हणाले की,

 

” गेल्या ६ महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या हक्काची लढाई लढत होता आणि आता त्याचाच फायदा घेऊन शकुनी काकांनी २ हजार कोटींची बँक आणि त्यांची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे. एसटी बँकेची निवडणूक घोषित केलेली आहे आणि जो थकबाकीदार आहे त्याला या निवडणुकीत मतदान करता येणार नाही असा फतवा काढल्या गेला आहे. साहजिकच जो कर्मचारी गेल्या ६ महिन्यांपासून बिनपगारी रस्त्यावर उतरला तोच थकबाकीदार आहे म्हणजे त्याला मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. १९९५ ला शरद पवारांनी स्वतःच्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रुपये वसूल केले.”

 

अस पडळकर यांनी म्हटलं आहे. 

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानाला शरद पवार जबाबदार – गोपीचंद पडळकर

 

 

पवारांनी वाढदिवसाच्या नावाखाली १०० कोटी गिळंकृत केले – पडळकर 

 

 

शरद पवार यांना भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रसार माध्यमांद्वारे चांगलच सुनावलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना पुढे ते म्हणाले की,

 

” पवारांनी वाढदिवसाच्या नावाखाली मनसोक्त रक्कम गोळा करून वेगवेगळ्या मार्गाने जवळपास १०० कोटी रुपये गिळंकृत केले आहे. आपल्या आसपासच्या बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या गाड्या खरेदी करून दिल्या. ज्यावेळी महाराष्ट्रातला एसटी कर्मचारी स्वतःच्या कुटुंबासोबत उघड्यावरती लढाई लढत होता त्यावेळी शरद पवार यांनी आपल्या सिल्व्हर ओकवरून जेवण तर सोडा पण पाणीसुद्धा पाठवून दिल नाही. यांच्यामध्ये जर थोडी जरी माणुसकी असती तर यांनी मृत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली असती.”

 

अस बोलत पडळकर यांनी शरद पवार यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. मात्र आता यावर पवार काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *