पोलीस निरीक्षकाकडून वारकरी संप्रदायाचा अपमान

मंडळी आपला भारतीय देश हा विविध धर्माच्या संस्कृतीने नटलेला आहे. वारकरी संप्रदाय हा संत नामदेवांनी सुरू केला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून तोच वारकरी संप्रदाय या भारतीय देशामध्ये अजरामर केला.

 

आज महाराष्ट्रामध्येच नाही, तर संपूर्ण भारतीय देशामध्ये वारकरी संप्रदाय पोहचलेला आहे. हजारो कीर्तनकार वारकरी किर्तनाच्या माध्यमातून समाजाला समतेचा उपदेश करताना आपण बघत असतो.

 

ब्राम्हण महासंघाच्या महिलांना डोक्यावर घेऊन गेलो असतो – रुपाली पाटील

 

मात्र काही लोक मनात द्वेष ठेवून विविध धर्मातील संस्कृतीला विरोध करत असतात. असाच काही प्रकार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये चालू असलेल्या एका कीर्तनात घडला. चाळीसगाव येथील हनुमान सिंग नगरामध्ये सप्तशृंगी मातेच्या वर्धापनदिनानिमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

 

त्यात सातव्या दिवशी ह.भ.प. सोमनाथ महाराज जपे यांची कीर्तन सेवा होती. कीर्तन चालू असताना चाळीसगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील हे त्या ठिकाणी आले आणि कीर्तन चालू असताना वारकऱ्यांसोबत दमदाटी केली. असा आरोप चाळीसगाव येथील वारकरी संप्रदायाने केला आहे.

 

वारकरी संप्रदायानुसार कीर्तनकार ज्या गादीवरून विवेचन करतात त्याला नारदाची गादी म्हटले जाते. मात्र पोलीस निरीक्षकाने त्या गादीवरच चक्क बूट नेल्याने वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. सोबत त्यांनी किर्तनकारासोबत वारकऱ्यांना मारहाण करण्याची धमकी दिल्याचासुद्धा आरोप चाळीसगाव येथील वारकरी संप्रदायाने केला आहे. 

 

राज ठाकरे ही भाजपची C टीम – अब्दुल सत्तार

 

 

या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी आपली बाजू मांडताना सांगितल की,

 

” कीर्तन चालू असताना सगळीकडे आवाज हा मोठ्याने येत होता. ज्यामुळे रहिवासी नागरिकांना त्रास होत होता. म्हणून आम्हाला कीर्तन थांबवावे लागले.”

 

अस के. के. पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र आता या प्रकरणावर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय काय प्रतिक्रिया देईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *