मंडळी महाराष्ट्रभरातच नाही, तर संपूर्ण देशभरात राज ठाकरे या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चालू आहे. अचानक राज ठाकरे यांनी साकारलेली धार्मिक राजकारणाची भूमिका हे धर्मवेड्या लोकांना चांगलीच भावली आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरे यांना राजकारनामध्ये फारस यश आलं नसल्याकारणाने त्यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या मुंबई येथील सभेत आणि ठाणेमध्ये घेतलेल्या उत्तर सभेत धार्मिक राजकारणाची भूमिका साकारली होती.
राज ठाकरे ही भाजपची C टीम – अब्दुल सत्तार
आता राज ठाकरे यांची जाहीर सभा हे १ मेला औरंगाबाद येथे होणार आहे. या सभेला प्रशासनाकडून परवानगी मिळणार की नाही ? हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. अनेक संघटनांनी राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेस विरोध केला.
मात्र अखेर प्रशासनाने या सभेला परवानगी दिली आहे. पोलीस प्रशासनाने ही सभा १६ नियमांनुसार व्हावी अशी चेतावणी राज ठाकरे यांना दिली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या सभेची जय्यत तयारी सुरू आहे.
काल राज ठाकरे पुण्यामधून १०० पुरोहितांचा आशीर्वाद घेऊन सभेसाठी रवाना झाले.या सभेला १००० पुरोहितांची उपस्थिती राहणार असून १५० पुरोहित या सभेचा शंखनाद करणार आहेत.
राज ठाकरेंची सभा उधळून लावू. भीम आर्मीच राज ठाकरेंना खुल चॅलेंज
आम्ही केसेस घ्यायला तयार – अमित ठाकरे
मंडळी राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या सभेत समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली होती. त्यामुळे अनेक संघटनांनी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला विरोध केला होता. दुसरीकडे पोलीस प्रशासनानेसुद्धा राज ठाकरे यांना कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्यास गुन्हा दाखल करू अशी चेतावणी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हटलं की,
” आम्ही केसेस घ्यायला तयार आहोत.”
अर्थात राज ठाकरे औरंगाबाद येथील सभेत आणखी धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करतील अस अमित ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- उध्दव ठाकरेंनी योगींकडे ट्युशन क्लास लावावा- आशिष शेलार
- महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरे च योगींना पत्र
- राज ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे- धनंजय मुंडे
- ३ मेपर्यंत मस्जिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू – दिलीप दातीर
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir