राज ठाकरेंची हुकूमशाही चालणार नाही – अजित पवार

अजित पवार

मंडळी काल औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेमध्ये लाखोंची गर्दी राज ठाकरे यांना ऐकायला आली होती. संपूर्ण महाराष्ट्र राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत? यावर लक्ष देऊन होता.

 

मात्र राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणातून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये पुन्हा करून समाजामध्ये दूषित वातावरण पेरण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून मुस्लिम समाजाविरोधात आपली भूमिका मांडत म्हटलं की,

 

अजाण लावणारे ऐकत नसतील तर मनगटातली ताकद दाखवू – राज ठाकरे

 

“३ तारखेला ईद असल्याकारणाने आम्ही समजून घेऊ. मात्र ४ तारखेला जर प्रत्येक मस्जिदींवरचे भोंगे उतरले नाही, तर महाराष्ट्रामध्ये काय घडेल हे मला माहिती नाही. अस करण्याची आमची इच्छा नाही, आम्हाला तशी गरजही नाही. पण तुम्ही जर भोंगे उतरवणार नसाल, तर आमच्या मनगटातली ताकद आपण बघितली नाही.”

 

अशी चेतावणी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाला दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देतांना त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की,

 

” हा महाराष्ट्र कायद्याने चालेल. संविधानाने जे अधिकार आणि नियम सांगितले आहेत त्यानुसार चालेल. इथे कुणाचीही हुकूमशाही चालणार नाही. फक्त मस्जिदींवरचेच भोंगे नाही, तर संपूर्ण धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवल्या जातील.”

 

अस अजित पवार यांनी राज ठाकरे यांना बजावलं आहे. 

 

भर सभेत खुर्च्या फेकल्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले?

 

 

लोकांना भडकवून देणं सोपं आहे अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला 

 

 

प्रसार माध्यमांशी बोलत असतांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देतांना म्हटलं की,

 

” लोकांना भाषणाच्या माध्यमातून भडकवून देणं सोपं आहे. मात्र समाजामधला सामाजिक सलोखा टिकवून ठेवणे कठीण आहे. जातीयवाद पेरून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करन महाराष्ट्राला परवडणार नाही.”

 

अशी टीका अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *