मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे झालेली रेकॉर्डब्रेक सभा आणि सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या अजाण च्या विधानांवर सद्धया महाराष्ट्रामध्ये चांगलाच वाद सुरू आहे. पोलीस प्रशासनाने राज ठाकरेंच्या सभेला १६ नियमांची अंमलबजावणी करायला सांगितले होते.
मात्र राज ठाकरे यांनी सभेमध्ये पुन्हा समाजात जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यांना अध्यापही अटक झालेली नाही.
तिरुपतीला मर्जीनुसार गेलो – वसंत मोरे
राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मस्जिदींवरील भोंगे उतवण्यासाठी ४ तारखेचा दिवस दिला होता. अन्यथा महाराष्ट्रामध्ये काहीही घडू शकत असे सांगितले होते. राज ठाकरेंच्या याच वक्तव्याची दखल घेत राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांना कामाला लावले आहे.
काही ठिकाणी अजाण हे विना भोंग्याचे पठण करण्यात आले. यावर राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की,
” आज काही ठिकाणी भोंग्यावर अजाण लावली नाही म्हणून आम्ही शांत बसलो अस समजू नका. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन राज्य सरकारने करावं. अन्यथा आम्ही दुप्पट आवाजात भोंग्यावर हनुमान चालीसा लावल्याशिवाय राहणार नाही.”
अस राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हटलं आहे.
अजाण लावणारे ऐकत नसतील तर मनगटातली ताकद दाखवू – राज ठाकरे
अन्यथा आम्ही आक्रमक होऊ- राज ठाकरे
मंडळी राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हटलं की,
” प्रत्येक मस्जिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजे. अन्यथा आम्ही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही.”
अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी राज्य सरकारपुढे मांडली आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- राज ठाकरेंची हुकूमशाही चालणार नाही – अजित पवार
- जो मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला?- नारायण राणे
- ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क देण्यात याव – ऍड. नईम शेख
- नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir