मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येला जाण्यासाठी निघणार असून आतापासूनच त्यांच्या आगमनाची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत अजाण आणि हनुमान चाळीसाचा मुद्दा उचलून धरला आहे.
ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राज ठाकरेंच्याच नावाची चर्चा सुरू आहे. नेहमी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपली भूमिका मांडणारे राज ठाकरे अचानक भाजपची बाजू घ्यायला लागल्याने भाजप आणि मनसे अशी युती भविष्यात होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.
राज ठाकरेंच्या सभेवर गृहखात कारवाई करणार
मात्र राज ठाकरे यांनी कितीही भाजपचे गुणगान गायले तरी उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मगितल्याशिवाय अयोध्येत पाय टाकू देणार नाही अशी धमकी दिली आहे.
ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हणाले की,
” महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच राज्य आहे. ज्यांच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक राहत होते. मात्र त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राज ठाकरे सारखा एक माणूस २००७ पासून उत्तर भारतीय लोकांना, बिहारी लोकांना, सिनेमातील लोकांना शिव्या देत आहे. आता अचानक त्यांचं हृदयपरिवर्तन जरी झालं असल, तरीही त्यांना आधी उत्तर भारतीय लोकांची माफी मागावी लागेल तरच मी त्यांना अयोध्येत पाय टाकू देणार. मला त्यांच्या अजाण आणि हनुमान चालीसा या मुद्द्यांविषयी काही घेणदेणं नाही. त्यांना अयोध्येत यायचं असेल तर उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी बस एवढंच माझं म्हणणं आहे.”
अस भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
अजाण लावली नाही म्हणून खुश झालो अस समजू नका- राज ठाकरे
राज ठाकरेंचा विरोध माझा व्यक्तिगत निर्णय – ब्रजभूषण सिंह
भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना पुढे म्हटलं की,
“भविष्यात भाजप आणि मनसे युती होईल असं जरी वातावरण दिसत असलं तरी, राज ठाकरेंना विरोध करणं हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे.”
अस त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता ५ जूनला राज ठाकरे अयोध्येला पोहचण्याआधी उत्तर भारतीय लोकांची माफी मागणार का? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- राज ठाकरेंच्या सभेवर गृहखात कारवाई करणार
- रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड
- शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र
- नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir