उध्दव ठाकरेंची तक्रार दिल्लीला जाऊन करणार- नवनीत राणा

नवनीत राणा

मंडळी राज ठाकरेपासून सुरू झालेला हनुमान चालीस्याचा वाद राणा दाम्पत्यापर्यंत पोहचला. राणा दाम्पत्याने हनुमान चालीस्याच वाचन मातोश्रीवर करू अस चॅलेंज शिवसेनेला दिल्यानंतर हा वाद चांगलाच उफाळून आला.

 

राणा दाम्पत्य मुंबईत दाखल होताच पोलीस प्रशासनाने यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही अटक केली होती. न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्या गेली.

 

नवनीत राणा navneet rana यांचा दाऊद गँगशी संबंध

 

मात्र आता जामीन मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हटलं की,

 

” मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अतिशय वाईट वर्तवणूक आमच्याशी केली आहे. त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला. तुरुंगात गेल्यानंतर कुठलाही लोकप्रतिनिधी हा गुन्हेगार असतो. हे ठीक आहे. मात्र आम्हाला गुन्हेगारांपेक्षाही वाईट वागणूक त्या ठिकाणी दिल्या गेली. मी दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची तक्रार करणार आहे. जे आमचे गृहमंत्री व प्रधानमंत्री महिलांचा सन्मान करतात. त्यांच्याकडे मी उध्दव ठाकरे यांची तक्रार करणार आहे.”

 

अस नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं. 

 

नवनीत राणा यांचं ब्लड प्रेशर वाढलं, भायखळा रुग्णालयात दाखल

 

न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही सन्मान करतो – नवनीत राणा 

 

 

प्रसार माध्यमांशी बोलत असताना नवनीत राणा पुढे म्हणाल्या की,

 

” जे लोक आम्हाला म्हणतात की आम्ही कोर्टाचा अपमान केला, तर आम्ही एक भारतीय नागरिक कोर्टाचा सन्मानच केला आहे आणि करत राहणार.”

 

अस नवनीत राणा यांनी यावेळी म्हटलं.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *