संदीप देशपांडे बद्दल माहिती द्या आणि ५० हजार घेऊन जा – भीम आर्मी

संदीप देशपांडे

मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नुकत्याच पार पडलेल्या सभांमधून वादग्रस्त वक्तव्ये करून संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष स्वतःकडे ओढवून घेतलं होतं. औरंगाबाद येथील सभेसाठी पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १६ नियमांचे पालन करण्यास सांगितले होते.

 

मात्र या सभेमध्ये आयोजकांनी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलीस प्रशासनाचे सर्व नियम न पाळल्यामूळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

 

राज ठाकरे यांना देशातून तडीपार करा – भीम आर्मी

 

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांना पोलीस अटक करायला गेल्यानंतर त्यांनी महिला पोलिसांना धक्का देऊन जबरदस्तीने पड काढला. या गडबडीमध्ये एक महिला पोलीस जखमी झाल्या होत्या.

 

‘या’ कारणामुळेच भडकली कोरेगाव-भीमा दंगल!

 

या पार्श्वभूमीवर भीम आर्मीने देशपांडे यांना प्रसार माध्यमांशी बोलत असताना चांगलच धारेवर धरलं आहे. भीम आर्मीने म्हटलं आहे की,

” संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं की, आम्ही राज साहेबांसाठी अंगावर केसेस घेऊ. मात्र जेव्हा पोलीस अटक करायला आले, तेव्हा आपण एका महिला पोलीसला धक्का देऊन पड काढला. संदीप देशपांडे बहूतेक गुजरातमध्ये लपले असतील. कृपया पोलिसांनी त्यांना फरार घोषित करावं. जो कुणी संदीप देशपांडे यांच्याबद्दल माहिती देईल त्याला भीम आर्मीकडून ५० हजार रुपयांच बक्षीस देण्यात येईल.”

अस आव्हान भीम आर्मीने केल आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा 

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *