जोपर्यंत राज ठाकरे मनसे कार्यालयात येत नाही तोपर्यंत मीसुद्धा तिथे जाणार नाही – वसंत मोरे

मनसे

मंडळी सद्ध्या महाराष्ट्रातील राजकारणात चांगलाच गदारोळ बघायला मिळतोय. एकीकडे भाजप शिवसेना वाद तर राणा आणि शिवसेना वाद चर्चेत आहे. सर्वात आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पेटलेला आंतरिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

 

गुडीपाडव्यानिमित्त घेण्यात आलेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मनसे पक्षातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मस्जिदीपुढे भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले होते. मात्र हा आदेश पुण्याचे मनसेचे नगरसेवक व शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी अमान्य केला.

 

तिरुपतीला मर्जीनुसार गेलो – वसंत मोरे

 

याच कारणावरून त्यांची राज ठाकरे यांनी शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आणि हा वाद सुरू झाला. दिनांक ५ जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा असून पुण्यामध्ये त्याकरिता नियोजन बैठकीसाठी वसंत मोरे यांना निमंत्रणसुद्धा देण्यात आलेल नाही.

 

या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं की,

 

” जोपर्यंत राज ठाकरे पुण्याच्या मनसे कार्यालयात येणार नाही तोपर्यंत मीसुद्धा त्या कार्यालयात जाणार नाही. ते आल्यानंतर १००% जाईल.”

 

अस त्यांनी यावेळी म्हटलं. 

 

 

निमंत्रणातून डावलण्यात का आलं हे मला माहिती नाही- वसंत मोरे

 

 

वसंत मोरे पुढे बोलताना म्हणाले की,

 

” राज साहेबांचा ५ जूनला होणाऱ्या अयोध्या दौरा नियोजन बैठकीसाठी मला का बोलावलं नाही ? याची मला कल्पना नाही. मात्र आंतरिक वाद मी सांगू शकत नाही.”

 

अस वसंत मोरे यांनी प्रसार माध्यमांना सांगितल. मात्र या आंतरिक वादापायी वसंत मोरे पक्ष सोडण्याचा टोकाचा निर्णय घेणार का? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *