राज ठाकरेंनी धमकीच पत्र आल्याची स्टंटबाजी बंद करावी – संजय राऊत

संजय राऊत

मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणांनी धुमाकूळ घातलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेहमी विरोधात बोलणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपाच्या बाजूने भूमिका मांडल्याने त्यांनी सर्वांना अचंबित करून सोडलं आहे.

 

भारतीय जनता पक्षाच राजकारण हे नेहमी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून मत मिळवायचं असत आणि आता तोच डावपेच राज ठाकरे यांनी वापरायला सुरवात केली आहे. येत्या ५ जूनला राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार असून त्याची जोरदार तयारी मनसे सैनिकांकडून केल्या जात आहे.

 

भाजप खासदाराच राज ठाकरेंविरोधात अयोध्येत रॅली काढून शक्ती प्रदर्शन

 

मात्र दुसरीकडे मनसेचे पदाधिकारी बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षिततेविषयी मोठा खुलासा केला होता. राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र आपल्या ऑफिसला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होत.

 

या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी राज ठाकरेंना चांगलच धारेवर धरलं आहे.

 

ते म्हणाले की,

 

” हा महाराष्ट्र आहे आणि इथे कुण्या नेत्याच्या केसालाही धक्का लावण्याची कुणामध्ये हिम्मत नाही. तरीपण राज ठाकरे यांना वाटतच असेल, तर त्यांनी केंद्र सरकारकडून सुरक्षा घ्यावी. अशी शेकडो पत्र शिवसेना भवनामध्ये रोज पडलेली असतात. राज ठाकरे यांनी स्टंटबाजी बंद करावी.”

 

असा संजय राऊत यांनी थेट टोला राज ठाकरे यांच्यावर लगावला आहे. 

 

राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र

 

राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी बाळा नांदगावकर यांनी थेट राज्य सरकारवर टीका करताना म्हटलं होतं की,

 

” राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही.”

 

अस नांदगावकर यांनी म्हटलं होतं.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *