मंडळी एकीकडे महाराष्ट्रभरात भोंगा, अजाण, हनुमान चालीसा याचा गदारोळ सुरू असताना अकबर उद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करणाऱ्या औरंगाजेबाच्या कबरीच दर्शन घेऊन शिवप्रेमींची माथी भडकवायच काम केलं आहे.
एमआयएमचे नेते अकबर उद्दीन ओवेसी व खासदार इम्तियाज जलील यांनी काल हैदराबाद येथून येतांना औरंगाबाद येथील औरंगाजेबाच्या कबरीच दर्शन घेऊन एक नवा वाद निर्माण केला आहे.
शिवसेना आमदार रमेश लटके यांच अकाली निधन
अकबर उद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला अस महाराष्ट्रातील संपूर्ण शिवप्रेमींच म्हणणं आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी या वादावरून आता थेट महाराष्ट्र सरकार आणि अकबर उद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना राज्यसरकारवर व अकबर उद्दीन ओवेसी यांव्यावर टीका करताना म्हटलं की,
” महाराष्ट्र सरकारला हनुमान चालीसा चालत नाही. ते जय श्री राम म्हणायला विरोध करतात आणि राजद्रोहाचे गुन्हे दाखल करतात. मात्र अकबर उद्दीन ओवेसी महाराष्ट्रात येऊन छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर हार चढवतो आणि तरीही दोन पायावर परत जातो. पण गेल्या २४ तासांमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही.”
अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.
राज ठाकरेंनी धमकीच पत्र आल्याची स्टंटबाजी बंद करावी – संजय राऊत
राज्यसरकार हे नामर्दांच सरकार आहे- नितेश राणे
मंडळी नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना पुढे म्हटलं की,
” महाराष्ट्र सरकारने १० मिनिटांसाठी पोलिसांना हटवाव अकबर उद्दीन ओवेसी याला औरंगजेबाकडे पाठवलं नाही तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही. कारण इथल्या सरकरकडून होणार नाही. हे नामर्दांच सरकार आहे.”
अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी महाराष्ट्र सरकार व अकबर उद्दीन ओवेसी यांच्यावर केली आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- राज ठाकरे भाऊ असतील तर आम्ही भैय्या लोक आहोत – मुंबई उत्तर भारतीय विकास सेना
- अजाण आणि हनुमान चालीस्याच्या वादावर फुटेज पण शेतकऱ्याच्या आत्महत्येला कव्हरेज नाही
- राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र
- राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच काम केलं आहे – नाना पटोले
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir