राजनीतिक पक्ष – भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
कार्यकाळ – ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९
जन्म – २० ऑगस्ट १९४४ मुंबई, महाराष्ट्र
आई – इंदिरा गांधी,
वडिल – फिरोज गांधी
भाऊ – संजय गांधी
आजोबा – जवाहरलाल नेहरू
आजी – कमला नेहरू
पत्नी – सोनिया गांधी
मुले – प्रियंका गांधी, राहुल गांधी
निधन – २१ मे १९९१
पंतप्रधान पदावर सर्वात कमी वयात विराजमान होणारे “राजीव गांधी” हे सर्वात युवा नेता आहेत. ते ‘केवळ ४० वर्षाचे’ असतांना पंतप्रधान झाले होते.
राजीव गांधी हे भारतातील ‘नऊ नंबर’ चे पंतप्रधान होते. “त्यांनी आधुनिक आणि तंत्रज्ञान भारत निर्माण करण्यासाठी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं होतं.”
राजीव गांधी यांनी ‘भारतात संगणक प्रणाली आणण्यासाठी खूपच सक्रियता दाखविली होती’, तसेच त्यांनी संचार क्रांतीला सुद्धा प्रोत्साहन दिल होतं.
याशिवाय त्यांनी भारतीय प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्याकरिता खूप प्रयत्न केले. अमेरिकेशी असलेल्या द्विपक्षीय संबंधात देखील त्यांनी बरीच सुधारणा केली होती.
राजीव गांधी यांनी देशात शिक्षणाचा मोठ्या जोमाने प्रचार आणि प्रसार केला होता. काश्मीर आणि पंजाब यांच्या अंतर्गत होत असलेला कलह नियंत्रित करण्यासाठी त्यांनी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं.
त्याचबरोबर राजीव गांधी यांनी देशाच्या हिताकरता अनेक महत्वाची निर्णय घेतले होते. देशातील युवकांच्या विकासाकरता त्यांनी विशेष लक्ष दिलं होतं.