मंडळी सध्याच्या परिस्थितीमध्ये जे वर्तमानपत्र आपण वाचतो किंवा इतर समाज माध्यमांवर ज्या बातम्या आपण वाचतो त्या खरच समाजपयोगी असतात का? सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या असतात का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील.
मात्र काहीच वर्तमानपत्रे असे आहेत जी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निडरपणे मांडत असतात. सध्याच्या काही वृत्तपत्रांमध्ये जो निडरपणा आला आहे तो डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यामुळेच आला आहे असं म्हणायला हरकत नाही.
कोलंबिया विद्यापीठातून परतलेल्या डॉ. आंबेडकरांना आपल्या समाजातील अस्पृश्यांचे प्रश्न मांडणार एकही वृत्तपत्र दिसत नव्हतं. परिवर्तन चळवळींसाठी त्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या वृत्तपत्राची गरज होती.
त्यांनी एकदा समाजहीताची बातमी टिळकांच्या केसरी या वृत्तपत्रामध्ये छापण्यासाठी पाठवली. त्यासोबत ३ रुपयेसुद्धा पाठवले होते. मात्र पैसे देऊनसुद्धा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला होता.
म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणार स्वतःच ‘मूकनायक ‘ नावाच स्वतंत्र वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वृत्तपत्र काढण्यासाठी भरमसाठ पैशांची गरज होती.
अशा परिस्थितीमध्ये तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘मूकनायक’ वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहले.
प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?
मूकनायकात तुकोबांचा अभंग
क्वचीतच लोकांना माहिती आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संत साहित्याचे गाढे अभ्यासकसुद्धा होते. संत तुकाराम महाराजांच्या साहित्याचा डॉ. आंबेडकरांवर चांगलाच प्रभाव होता.
त्यांनी संत तुकारामांच्या
” काय करू आता धरुनीया भिड। निःशंक हे तोंड वाजविले।। नाही जगी कुणी मुकीयांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हित।।”
या अभंगाने मूकनायक वृत्तपत्राची सुरवात केली होती.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- शंभु बंध्यो बजरंग……!!
- डॅडी डॉन ते आमदार
- या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद
- १९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir