मंडळी राजकीय क्षेत्रात नेतेमंडळींचे चाहते किंवा त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते आपण बघितले असतील. मात्र एखाद्या कार्यकर्त्याच्या प्रभावाने त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्तावर्ग हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडलं अस म्हणणं वावग ठरणार नाही.
आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ ला ठाणे येथे झाला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि भाषण शैलीचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव झाला. आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला.
आनंद दिघे यांचा ठाणे येथे मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग होता. त्यामुळे त्यांना ठाणे येथील शिवसेना जिल्ह्याध्यक्षपद देण्यात आलं. ठाण्यातील जनतेसाठी दिघे अहोरात्र झटत होते. जनतेसाठी स्वतःला त्यांनी एवढं झोकून दिल होत की, त्यांनी विवाहसुदधा केला नाही.
ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘आनंदआश्रमाची’ स्थापना केली होती. ज्यामध्ये जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचे ते काम करत होते. प्रत्येक काम ते ताबडतोब करायचे. ठाण्यातील अनेक लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला.
पाहता पाहता आनंद दिघे यांचा चाहता वर्ग एवढा वाढत गेला की त्यांची तुलना हे बाळासाहेब ठाकरेंशी होऊ लागली होती. या तुलनेमुळे तेव्हा शिवसेनेमध्ये अस्वस्थता होती अस तेव्हा म्हटल्या जात होतं.
याबद्दल जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई असे म्हणतात की,
” दिवसेंदिवस आनंद दिघे यांचं प्रस्थ वाढत चाललं होतं. त्यांना वलय, प्रसिद्धी लाभत होती. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय, अशी भावना मातोश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होतं. कारण दिघेंमुळे शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय सुरू झाला होता. पण शिवसेनेत अस चालत नाही. हे राजा आणि बाकी प्रजा, अस धोरण आहे शिवसेनेत. यामुळे बाळासाहेब अस्वस्थ झाले होते. अशी चर्चा त्यावेळी ठाण्यात होती.”
दिघेंविषयी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी असही म्हटल्याची चर्चा होती की ,
” आनंद दिघे यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका नाही. पण ज्याप्रमाणे ते काम करतात त्याविषयी प्रश्न आहे.”
यावर आनंद दिघे यांनी म्हटलं होत की,
” बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीशिवाय मी कुठलंही काम करत नाही.”
या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद
मंडळी आनंद दिघे यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ठाण्यातील लोकांनी धर्मवीर म्हणून संबोधल होत. म्हणून धर्मवीर आनंद दिघें आजही जनतेच्या मनात अजरामर आहेत.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- ज्याला वॉचमनची नोकरीसुद्धा नाकारल्या गेली तो झाला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री
- केजरीवाल यांनी २०१४ ला मुख्यमंत्री पदाचा का दिला होता राजीनामा?
- गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता
- आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir