जेव्हा आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर घडलेल्या दंगलीत २ निर्दोष जीव गेले…

आनंद दिघे

मंडळी ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आणि प्रत्येक शिवसैनिकाच प्रेरणास्थान असणारे आनंद दिघे यांच्या मृत्यूवर अजूनही जनता संशयित आहे.

 

आनंद दिघेंचा वाढता प्रभाव आणि चाहता वर्ग वाढत असताना अचानक त्यांचा वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी मृत्यू होणे ही बाब खरतर काही शिवसैनिकांना न पटण्यासारखी होती. आनंद दिघे यांचा मृत्यू २६ ऑगस्ट २००१ ला ठाण्यामधल्या सुनितादेवी सिंघाणिया रुग्णालयात झाला.

 

दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?

 

मात्र त्यांच्या मृत्यूनंतर जोरदार दंगल उसळली होती. हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. ठाण्यामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. कुणी म्हणत होत दिघेंची हत्या झाली तर कुणी म्हणत होत रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला.

 

याच कारणावरून रागाच्या भरात दिघेंना ज्या रुग्णालयात ठेवल होत ते रुग्णालय शिवसैनिकांनी जाळून टाकलं. मात्र आनंद दिघेंच्या मृत्यूआधी घडलेल्या घटनेवरून त्यांचा मृत्यू होणं हे न समजण्यासारखं होत. रुग्णालयात दाखल होण्याआधी म्हणजेच २४ ऑगस्ट २००१ ला दिघेंचा एका कार अपघातात पाय फ्रॅक्चर झाला होता.

 

आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात?

 

ज्यामुळे त्यांना ठाण्यातील सुनीता देवी सिंघाणिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २६ ऑगस्ट २००१ ला त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि संध्याकाळच्या सुमारास दिघे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

 

त्यानंतर लगेच १० मिनिटांच्या अंतरात दुसरा झटका आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला अस त्यावेळी सांगण्यात आलं होतं. मात्र ठाण्यातील शिवसैनिकांचा दिघेंच्या अचानक झालेल्या मृत्यूवर विश्वास नव्हता.

 

ज्यामुळे शिवसैनिकांना राग अनावर झाला आणि अवघ्या ३ तासात सिंघाणिया रुग्णालयाच रूपांतर एका खंडरमध्ये झालं. शिवसैनिकांनी २०० खाटांच संपूर्ण हॉस्पिटल जाळून टाकलं. हॉस्पिटलमधील नर्स आणि डॉक्टरांना आधी बाहेर काढण्यात आलं होतं. 

 

दोन निर्दोष जीवांचा मृत्यू 

 

आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर जाळण्यात आलेल्या हॉस्पिटलमधल्या नर्स आणि डॉक्टरांना जरी अगोदर बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र एका मासिकानुसार हॉस्पिटल जाळल्याने त्या ठिकाणची सगळी इलेक्ट्रिसिटी बंद पडली होती.

 

ज्यामुळे सर्व व्हेंटिलेटर बंद पडले आणि व्हेंटिलेटरवर असणाऱ्या एका ६ महिन्याच्या व ६६ वर्ष वय असलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला होता.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *