उदय सामंत गेले की पाठवले

उदय सामंत

मंडळी शिवसेनेमध्ये मोठं नाव असलेले आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात अचानक पुकारलेल्या बंडामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.

 

एकनाथ शिंदेंसोबत जवळपास शिवसेनेचे ४० आमदार गुवाहाटीला गेलेले आहे. मात्र पाठोपाठ शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक व महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेसुद्धा शिंदे गटात काल सामील झाले आहे.

 

कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता

 

उदय सामंत यांच्या शिंदे गटात सामील होण्याने जनतेचा राजकीय नेत्यांवरून विश्वास उडाल्याची भूमिका अनेक लोकांनी समाज माध्यमांवरून मांडली आहे. कारण एक ते दोन दिवसांपूर्वी शिवसेना भवनात पार पडलेल्या कार्यकारणी बैठकीला सामंत हजर होते आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते थेट गुवाहाटीचा रस्ता गाठून शिंदे गटात सामील झाले.

 

यावर अनेक शिवसैनिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र उदय सामंत हे खरच स्वतावरून शिंदे गटात सामील झाले की उध्दव ठाकरेंच्या माध्यमातून पाठवल्या गेले. या संशयावरून उदभवलेल्या अनेक चर्चांना आता उधाण आलं आहे.

 

असा लागू होतो पक्षांतर बंदी कायदा…

 

नुकत्याच मुंबईमधील अनेक ठिकाणी पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यांमध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना नेत्यांवर बोचरी टीका केली.

 

मात्र उदय सामंत यांच्यावर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून एकही टिकेच विधान निघाल नाही. यावरून सामंत यांना उध्दव ठाकरे यांनी शिंदेकडे स्वतावरून पाठवलं असण्याचा कल जनतेकडून वर्तवल्या जात आहे. 

 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे किती आमदार हे स्वइच्छेने गेले आहे? किती आमदार हे दबावाखाली गेले आहे? आणि किती आमदार हे पाठवल्या गेले आहे? यावर सद्ध्या महाराष्ट्रातील जनतेला संशय आहे. येत्या काळामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होईल. यासाठी संपूर्ण लोकांची उत्कंठा वाढलेली आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *