मंडळी शिवसेनेमध्ये सद्ध्याच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे शिवसेनेसाठी नवीन नाही. याआधी शिवसेनेतील अनेक नेत्यांनी बंड करून शिवसेनेला रामराम ठोकला आहे.
यामध्ये सर्वात आधी १९९१ ला छगन भुजबळ यांनी शिवसेनेमध्ये बंड केला आणि शिवसेना सोडली. त्यांनतर नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी अनुक्रमे शिवसेना सोडली.
रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास
मात्र जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेनेचा पदभार होता तेव्हा बंडू शिंगरे नावाच्या एका शिवसैनिकाने बंड करून शिवसेना सोडली आणि ‘प्रतिशीवसेना’ काढून थेट बाळासाहेब ठाकरे यांना आव्हान दिल होत.
बंडू शिंगरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना
“हिम्मत असेल तर लालबागमध्ये सभा घेऊन दाखवा”
अस आव्हान केलं होतं. तेव्हा बाळासाहेब प्रचंड संतापले आणि लाल बागमध्ये सभा घेण्याच बंडू शिंगरेंच आव्हान स्वीकारलं होत. त्यांनी पुढील अवघ्या काही दिवसांमध्येच लालबागमध्ये सभा घेण्याच प्रयोजन केलं आणि शिंगरेंच आव्हान स्वीकारल व सभा घेतली.
बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून
अस म्हणतात की तेव्हा प्रतिशीवसेना काढणाऱ्या बंडू शिंगरे यांची बाळासाहेब ठाकरे यांनी लालबागमध्ये सभा घेऊन चांगलीच नाचक्की केली होती.
लालबागमध्ये आव्हान स्वीकारून सभा घेतल्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिम्मतीचा परिचय तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आणि त्यांच्या विरोधकांना चांगल्या रीतीने झाला होता. म्हणून बाळासाहेब ठाकरे हे रसायन भल्याभल्यांना समजलं नाही असं आताही या देशातील राजकीय समीक्षक म्हणतात.
मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे आव्हानं स्विकारता येतील का? हा प्रश्न संपूर्ण जनतेला पडलेला आहे. मात्र उध्दव ठाकरेंच्या राजकीय नेतृत्वक्षमतेवरून लक्षात येत की, ते शिवसेना पुढे चालवायला सक्षम आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? ती कशी लागू होते?
- उदय सामंत गेले की पाठवले
- कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता
- दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir