वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक होणाऱ्या फडणवीसांचा राजकीय जीवन प्रवास

देवेंद्र फडणवीस

मंडळी काही राजकीय नेत्यांचा जीवन प्रवास जर आपण निरखून बघितला तर, खरच अस्वस्थ करणारा असतो. त्यांचा संघर्ष, त्यांची मेहनत हे त्यांच्या यशाचं विशेष कारण असत.

 

हो मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका संयमी आणि कर्तव्यदक्ष असणाऱ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्याबद्दल. फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० ला नागपूरमध्ये एका ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला.

 

मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

 

फडणवीस यांना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे वडिलांकडून मिळाले.

 

“वडिलांना इंदिरा गांधींमुळे अटक झाली म्हणून मी गांधींच्या कुठल्याही शाळेत शिकणार नाही.”

 

अस वयाच्या सहाव्या वर्षी सांगणाऱ्या फडणवीसांमध्ये बालपणापासूनच राजकीय गुण दिसू लागले होते. नंतर ते १९८६-१९८९ या कालावधीमध्ये ABVP चे सदस्य होते.

 

फडणवीस १७ वर्षांचे असतांना त्यांचे वडील गेले. त्यामुळे त्यांच्या जीवनात संघर्ष आणखी वाढला होता. वयाच्या अवघ्या २२ वर्षी त्यांनी नागपूर महानगरपालिका निडवणुकीमध्ये विजय मिळवला आणि नगरसेवक झाले.

 

रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

 

फडणवीसांच कार्यकर्तुत्व वाढत चाललं होतं. त्यानंतर २७ वर्षांचे असतांना त्यांना नागपूर महापौर पदाचा मान मिळाला. महापौर असतांना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कर्तव्यदक्ष स्वभावाने सर्वांची मने जिंकली होती.

 

त्यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय जीवनात कधीच मागे वडून बघितले नाही. 

 

वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री

 

२००२ साली देवेंद्र फडणवीस यांना ‘राष्ट्र मंडळ संसदीय संघ’ यांच्या माध्यमातून ‘सर्वश्रेष्ठ संसदीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. २००६ मध्ये अमृता रानडे यांच्याशी फडणवीसांचा विवाह झाला.

 

नागपूर मधून चारवेळा विधानसभा निवडणूक जिंकून आमदार पद भूषवल्याने देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम आणि प्रभावी नेते म्हणून भारतीय जनता पक्षात ओळखल्या जाऊ लागले. आणि वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी ते महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री झाले.

 

शरद पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सर्वात तरुण वयात मुख्यमंत्री होणारे नेते आहे. आता सद्ध्याच्या परिस्थितीमध्ये ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *