मंडळी ११ जुलैला भारतीय देशाच्या नव्या राजमुद्रेच अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र मोदींनी केलेल्या अनावरणावर आणि नव्याने तयार केलेल्या राजमुद्रेवर सुरू झालेल्या विवादाला आता चांगलच उधाण आलं आहे.
संसदेच्या नव्या इमारतीवर बसवलेल्या राजमुद्रेवरील सिंहांचा देखावा बदलून तो रागीट करण्यात आल्याचा दावा अनेक राजकीय नेत्यांनी व राजकीय समीक्षकांनी केला आहे. सारणातच्या अशोक स्तंभावर असलेल्या राज्यमुद्रेवरील सिंह हे रागीट आणि अतिशय उग्र दिसतात.
अशाप्रकारची टीका अनेक राजकीय नेत्यांनी केली आहे. यावर तेलंगणा राष्ट्रसमितीचे नेते वाय. सतीश रेड्डी यांनी मोदी सरकारवर टीका करत म्हटलं आहे की,
” अशोकाचे सिंह आता सुळे दाखवतांना दिसत आहेत? मोदी सरकारने ही नवीन भर घातलेली दिसतेय.”
असा प्रश्न रेड्डी यांनी मोदी सरकारला केला आहे.
त्यांनंतर नरेंद्र मोदी यांनी या राजमुद्रेचे अनावरण हिंदू धर्म पद्धतीने पूजा अर्चा करून केले आहे. या देशामध्ये हिंदूधर्मव्यतीरीक्त इतर धर्मसुद्धा राहतात.
भारतीय संविधानाच्या प्रास्तविकामध्ये धर्मनिरपेक्ष या तत्वयुक्त शब्दाचा प्रयोग असतांना देशाच्या प्रधानमंत्र्याने अशा प्रकारचं असंविधानिक कृत्य करणे कितपत योग्य आहे? अशाप्रकारचा प्रश्नसुद्धा समाज माध्यमांवर नेटकऱ्यांकडून केल्या जात आहे.
अनावरण प्रधानमंतत्र्यांनीच का केलं?
मंडळी ११ जुलैला भारतीय संसदेच्या इमारतीच्या राजमुद्रेच अनावरण हे प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते करण्यात आल्याने एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
” राजमुद्रेच अनावरण हे लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते न होता प्रधानमंत्र्यांच्या हस्ते का करण्यात आलं?”
असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर अनेक विवाद निर्माण झाले आहे.