स्वतंत्रसमरभुमी गाविलगड

गाविलगड

विदर्भ !!

महाभारत काल ते त्याच्या ही अगोदर पासून राजघराणी जिथे वसली असे विदर्भ…

 

जिथे अखंड महाराष्ट्राचे भविष्य गर्भात वाढले अश्या जिजाऊ मासाहेबांचे माहेर , शिवसिंहछाव्याला मनसब ज्या भागाची होती ते भाग,  आणि बंगालच्या साम्राज्यात जाऊन आपल्या शौर्याचे कवने लिहून घेणार्या नागपुरकर भोसल्यांचा विदर्भ…

 

आणि याच भोसल्यांचा अधिपत्याखाली असलेला किल्ला म्हणजे सातपुड्याच्या कुशीत वसलेला , एलिचपुर म्हणजे अचलपूर चे रक्षकगड असलेला आणि चिखलदरा चे सामर्थ्य असलेला गाविलगड… !!

 

वाकाटक, राष्ट्रकूट ते देवगिरी च्या यादवांच्या काळापासून  नागपुरकर भोसलेंपर्यंत शतकांचा इतिहास या गडाला लाभलेला . अश्या या गवळ्यांचा गड म्हणजे गाविलगड च्या इतिहास ची पाने स्पर्श केली की दाह जाणवतो सुहासिनींच्या जोहरचा आणि विर बेनिसिंह च्या तलवारीचा ..

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडून वारंवार होत आला आहे महाराष्ट्राचा अपमान

 

तेव्हा जेव्हा हे वर्ष होते १८०२ !! पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये वसईचा तह झाला आणि ब्रिटिशांनी आपल्या काळोख नजरा महाराष्ट्रात घुमवल्या…

 

रायगडावर आग लावत हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी ब्रिटिशांनी आपले हात सरसावले आणि महाराष्ट्राच्या वर्हाडात आक्रमणाची पाऊल टाकण्यासाठी ब्रिटीश जनरल वेलस्ली च्या हाताखाली फौज पुढे निघाली…

 

आक्रमणाची खबर सरसर करत नागपूर च्या भोसले महालात आदळली आणि भोसल्यांचा राजकारणात वाढ झाली.. पण गेली कित्येक राजघराणी ज्या फितुरीच्या कलंकाने ग्रस्त होती तो कलंक इथेही लागलेलाच..

 

म्हैसूर चा टिपु सुलतान चा पाडाव करुन निजामांशी हात मिळवून वेलस्ली , कर्नल स्टिव्हनसन्स च्या फौजेची तुकडी घेऊन नागपुरकर भोसल्यांना धमकावत सुटला पण भोसले मात्र त्याला काही भीक टाकेना, 

 

वेलस्ली आपली फौज घेऊन मराठवाड्यात पोहोचला आणि दुसरीकडे नागपुरकर भोसले,शिंदे सह मराठ्यांच्या तलवारीचे पाणी पाजण्यासाठी सज्ज झाले…

 

आणि गाविलगड गुप्त खलिता येऊन पोहोचला….

 

या वेळी भोसल्यांचा दौलतीचा बंगालचा खजिना याच गडावर होता , गाविलगड ची सुरक्षा किल्लेदार रायाजी भोसल्यांचा हाती सोपवुन गाविलगड चा रणरुद्र सेनापती बेनिसिंह मराठमातीच्या सन्माचा लढा देण्यासाठी आसई रणभूमीवर उतरला

 

आणि भिडल्या तलवारी, खड्ग खणाणले , किंकाळी उठल्या हर हर महादेव चित्कार झाला आणि अस्मानी फत्ते ब्रिटिश कर्नल चं मुंडकच धडावेगळे झाले…

 

वेलस्ली ला धडकी भरली

 

आणि वेलस्ली बेनिसिंहास शरण गेला…

 

ब्रिटीशांना नामोहरम करून फौजा परतल्या पण वेलस्ली च्या मनात हा पराभव भयानक रुतला होता..

 

मराठ्यांचा फौजा परतताच वेलस्ली बाळापूर ला येउन महिपतरायच्या संगतीला आता गाविलगड जिंकण्यासाठी स्वप्न बघायला लागला, आडगाव ला मराठ्यांचा भीषण पराभव करुन वेलस्ली गाविलगड कडे वळला ,

 

मधातील सर्व गावं कैदेत घालत , फितूर वकिलांना आपल्या बाजूला करून, नागपुरात एकही वार्ता पोहचणार नाही याची फितुरीच्या मदतीने शाश्वती करून वेलस्ली ने खासा गाविलगड घेरला तारीख होती ९ डिसेंबर १८०३  ,

 

वेलस्लीने गडावर चढण्याचा बेत आखला पण मराठ्यांनी जागेवरच त्याचा बेत फस्त केला , तोफा आग ओकु लागल्या , गडावरून बिजली तोफ धडाडली सल्लग दिवस पालटायला लागले गड झुंजत होता,

 

लढत होता, बेनिसिंहाची तलवार तडफडत होती , गडाचा तोफखाना प्रमुख रहिमखान झुंजत होता पण गडावर एक भिषण वार्ता पसरली , गडावरचा गोळा बारुद संपला …

 

आता अंतिम युद्ध ठरले,  

 

तारीख होती १४ डिसेंबर १८०३ चोर दरवाज्यातून गडाचा खजिना रायाजींच्या नजरेखालून नरनाळा ला निघाला, आणि एक चिता पेटली हत्ती तलाव

 

आणि देव तलावाच्या मधोमध चंदनाची चिता रचून बेनिसिंहाची तरुण राणी रुपकुवर आपल्या तेरा सौदामिनी सह जोहर च्या अग्निकुंडात आहुती देण्यास सज्ज झाली…

 

शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात

 

किल्ल्याच्या बाहेर बेनिसिंहाची तलवार चालायला लागली पण भयाण गोळीबार सुरू झाला… एक एक करत विर धारातीर्थी पडु लागले गोळीबारात जखमी झालेल्या रक्तातही बेनिसिंह लढत होते ,

 

तोफखानाप्रमुख कोसळले आणि सरसर करत एक गोळी आरपार त्या रणरुद्र योद्धाच्या छातीतून निघाली खासे बेनिसिंह कोसळले व गडावर सौदामिनींची जोहर चिता पेटली…

 

राष्ट्रासाठी बलिदानाच्या गाथेचं एक आणखी पान लिहल्या गेले आणि जोहर च्या धगात ते आणखी चकाकले….

 

✍️अक्षय चंदेल 

७५५९२४१३४७

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *