हिंदुस्थानात उतरलेल्या परकीय ब्रिटिशांनी भारताच्या भुमी, संस्कृती, इतिहास, वर्तमान ते भविष्यवरही घाला घातला होता…
१८५७ चे स्वतंत्रसमर अनेक किंकाळ्यांच्या आवाजाखाली दाबून ब्रिटीशांच्या हरामखोरीचे कारनामे थांबत नव्हते…
आपल्याच देशात आपलेच भारतीय गुलाम झाले होते आपल्या मातृभूमीला गुलामीच्या बंदीवासातुन मुक्त करण्यासाठी भारताच्या भूमीत अनेक क्रांतिकारक जन्माला येत होते पण आता ती उपज थांबावी म्हणून ब्रिटिशांनी एक काळा कायदा प्रेरित केला नाव होते रौलट कायदा ( मार्च १९१९)….
ठाकरे परिवारातील तेजस ठाकरे ची तुलना व्हीव्हीयन रिचर्ड्ससोबत का केली जाते?
या रौलट कायदा विरोधात उठणारी प्रत्येक आवाज दाबण्यासाठी ब्रिटिशांनी सर्व दंड भेद वापरले , विरोधात चलणार्या सत्याग्रही लोकांना कैदेत घातले ,
ज्याचा निषेध करण्यासाठी लोक जमली त्यावर भडीमार गोळ्या झाडून रक्ताचा सडा पाडला आणि अमृतसर मध्ये कडक संचारबंदी लागली…
पर हिंदुस्थानीओ के बुलंद इरादो को कोई रोख सके ऐसी कोई दिवार कहा…?
आणि मग एक सभा ठरली …एक एक करत कानावर खबर पडत गेल्या तारीख होती १३ एप्रिल १९१९ दिवस बैसाखी चा..
सुवर्णमंदिरात दर्शन घेऊन लहान मुले, स्त्रिया ,म्हातारी माणसे, तरुण अनेक अनेक आपल्या सणाला साजरी करण्यासाठी जालियनवाला बाग ला जमली होती…
देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?
” जो बोले सो निहाल …. सतश्री अकाल !!”
ढोलाच्या तालावर सर्वांच्या जुबानीवर वतन चे तराने होते , ” ऐ वतन तेनु की की मे दे पावा …तु मागे मेनु जान तो युही तैनु दे जावा….!!”
भारत माता की जय !!
पण या निष्पाप लोकांना अंदाज सुद्धा नव्हता की पुढे काय होणार होते….
कळकळ करत अचानक बागचे गेट बंद झाले आणि गोरा ब्रिटीश अधिकारी जनरल डायर सर्वांपुढे सैनिकांना एका रांगेत एक्टिव करून शांत नजरेने आनंद साजरा करणार्यां लोकांना बघत राहिला…
आणि अचानक त्याच्या कानावर आवाज पडला… ” वंदे मातरम..!! भारत माता की जय….”
आणि डायरचे डोळे विस्फारले , Bloody Indian’s काळे शब्द बाहेर पडले ” फायर….. !!!
आणि धडधड करत गोळ्या चलायला लागल्या देशभक्तांची ह्रदय चिरत , भारत मातेचे जयकार थांबवत , रक्ताचे थारोळे उडवत सुमारे ३९७ लोकांना मारत ,१९२ लोकांना जखमी करत , लहान लहान मुलांचे घास घेत या गोळ्या चालत होत्या
एक, नव्हे दोन नव्हे तब्बल १६५० गोळ्या झाडल्या गेल्या , १२० लोकांनी जीव वाचवण्यासाठी विहीरीत उड्या घातल्या तीही संपली , ४२ लहान मुले मारली आणि रक्ताने लालबुंद माती करत डायर बाहेर पडला…
गिधाडांच्या आवाजाने आकाश भरले…
प्रेत उचलून सुद्धा मातीचा लाल रंगात रंग बदलला …
रात्री पालटून सर्व शांत झालेल्या त्या बागेत एक लहान मुलगा एकाला स्वतंत्रदेवतेला बसलेला दिसला …आपल्या लहानग्या हाताने तीथली माती पिशवीत भरत होता मग त्याला सहज विचारले…
” किसलिये ले जा रहे हो ये मिट्टी…!!”
” हमारे लोगो के खुन से.रंगी है ये मिट्टी हमे ये बलिदान याद दिलायेगी…!!”
नाम क्या है बेटा आपका !!
चेहऱ्यावर मासुमीयत पण डोळ्यात क्रांतीची छटा उमटलेल्या त्या निरागस ओठातून नवीन अध्याय चे.नाव बाहेर पडले…
” जी मै सरदार भगतसिंग…..!!!”
✍🏻अक्षय चंदेल ©
#जिगरे ❤️
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- ईव्हीएमचा वाद अन गोपीनाथ मुंडें चा अपघात की हत्या?
- साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक!
- स्वतंत्रसमरभुमी गाविलगड
- २००७ मध्ये मानवाला खाण्यायोग्य नसणाऱ्या गव्हाचा घोटाळा उघड करणाऱ्या सोमय्या चा इतिहास
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir