#ए वतन तेरे लिये
लाहोरच्या तुरुंगात भगतसिंगांना कैद करण्यात आले…
जगभरात स्वतःच्या अनुशासनाचे बोंब मारणारे ब्रिटिश क्रांतिकारकां सोबत अगदी अमानुषपणे वागत होते , जेवणाच्या नावाखाली अपोषक जेवण , पाण्याची सोय सुद्धा पुरक नाही , स्वच्छता च्या नावाने बोंब ,
रोज कैद्यांना मारायचं पण मानसिक खच्चीकरणाच्या नावाखाली जनावरांप्रमाणे वागणूक क्रांतिकारकांना दिली जात होती आणि अश्यातच या अमानुषपणावर इंकलाबी आवाज क्रांतिकारकांनी उठवला….
आमरण उपोषण !!
उपोषणाला सुरुवात झाल्यावर क्रांतिकारकांनी अन्नाचा त्याग केला…
ब्रिटिशांच्या प्रत्येक अत्याचार ला कणखरपणाने सर्व समोर जात होते..
तिकडे आझादांनी या उपोषणाला भारतभर पसरवण्याचे कार्य केले…
ब्रिटिशांवर.दडपण येत होते..
रोज क्रांतिकारकांवर मारहाण होत होती , तहान लागेपर्यंत मारायचं जेणेकरून उपोषण थांबेल…
पण क्रांतिकारक मागे हटायला तयार नाही , पाण्याएवजी दुध, दही ने माठ भरून ठेवले पण क्रांतिकारकांनी तेही फोडून टाकले ,
क्रांतिकारकांच्या लघवीच्या जागेवर लाथांनी मारण्यात आले , लाठी मार केले , अंगावर मिठ लावून मारले पण तरीही क्रांतिकारक काही झुकेना..
ही लढाई फक्त भुकेची नव्हती यात अन्न पाणी सोबत मागणी होती ती पुस्तकांची सुद्धा…!!
या अत्याचार ला थांबवण्यासाठी आझादांनी आणि भगवती चरण वोहरांनी बॉम्ब ने जेल ची भिंत पाडण्यासाठी प्रयत्न केला…
पण नियती ती क्रूर या प्रयत्नात भगवती वोहरांना जीव गमवावा लागला…
ब्रिटिशांनी अमानवी अत्याचार ला सुरुवात केली , क्रांतिकारकांच्या नाका, तोंडात नळ्या टाकून दुध जबरदस्तीने ओतण्याचे प्रयत्न केले ,
असाच प्रयत्न जतीन दा वर सुद्धा झाला पण ती नळी जाऊन त्यांच्या फुफ्फुस ला लागली , संसर्ग वाढले , रक्तांच्या उलट्या सुरू झाल्या , भगतसिंगांनी जतीनना थांबण्यासाठी सांगितले पण जतीन थांबले नाही…
शेवट पर्यंत उपोषणवर अटळ राहिले आणि भारत मातेच्या चरणी आपले श्वास अर्पण करून टाकले….
भगवतींच्या मरणाचं दुख मागे ठेवून त्यांच्या पत्नी दुर्गाभाभी नेहमी प्रमाणे क्रांतिकारकांच्या मदतीला पुढे आल्या..
जतीन दासांचा देह त्यांनी बाहेर काढला..
जतीन दाच्या देहाचे स्विकार करण्यासाठी खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस आले…पाच लाख लोकांच्या अश्रूंनी जतीन दाचा अंत्यसंस्कार झाला…
पण उपोषण तसेच सुरू राहिले…
भगत ब्रिटिशांच्या हरामखोरी वर हसत राहिले…
एकदा तर भगत ला विचारले सुद्धा…
“एवढे होऊन सुद्धा हसतोय तु भगत…!! “
आणि भगत म्हणाले…
” माझ्या हसण्याने तुम्हाला आज एवढा त्रास होतोय तर त्या क्षणी काय कराल जेव्हा मी फासीच्या तख्तावर असेल आणि जोरजोराने इंकलाब जिंदाबाद चे नारे देत असेल….!! “
शेवटी ब्रिटिशांना झुकावं लागलं, क्रांतिकारकांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या तिकडे लंडन मध्ये भगतसिंग ला फाशी द्या म्हणून तेवीस वर्षाच्या पोराच्या विरोधात मोर्चे निघायला लागले….
” ए शहिदे मुल्को मिल्लत मै तेरे उपर निसार…
अब तेरे हिम्मत का चर्चा गैरो की महफील मे है….”
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है…
✍🏻अक्षय चंदेल©
#जिगरे
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir