मंडळी आजचा तरुण म्हटलं की पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे रोजगाराचा. काही रोजगार मिळून जातात तर काही रोजगार मिळवून घ्यावे लागतात.
मात्र सरकारकडून पदवीधरांची रोजगाराच्या बाबतीत नेहमीच गळचेपीच होत आली आहे. काँग्रेस आणी भारतीय जनता पक्षाने फक्त आश्वासनांचा पूर पदवीधरांसमोर मांडला. मात्र कुणीही त्यांच्या रोजगाराची पुढे येऊन ठाम भूमिका घ्यायला तयार नव्हतं.
अशा परिस्थितीमध्ये डॉ. अनिल अमलकार नावाचा एक व्यक्ती याचं पदवीधरांसाठी धावून आला. पदवीधरांच्या रोजगाराबाबत काय समस्या आहे हे डॉ. अमलकारांनी समजून घेतलं. आणि हजारो तरुण एकत्र करून त्यांनी पदवीधरांच्या रोजगारासाठी आवाज उठवला.
सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या पदवीधर तरुणांच्या समस्या काय असतात ? त्यांना कशाप्रकारे आपल्या कौटुंबिक गरजा पूर्ण कराव्या लागतात?, त्यांच्या शिक्षणासाठी पालकांनी घेतलेले अथक परिश्रम या सर्व गोष्टींचा जाब त्यांनी आंदोलनादरम्यान पूढाकार घेऊन शासनाला विचारला होता.
अमरावती पदवीधर निवडणुकीत तरुणांमध्ये का लोकप्रिय आहे प्रा. डॉ. अनिल अमलकार ?
मंडळी पावसाळा सुरु झाला की ज्याप्रमाणे बेडूक बाहेर पडतात. त्याचप्रमाणे निवडणूक लागली की काही राजकिय नेते आपल्या घराच्या बाहेर पडून जनतेसमोर येत असतात.
अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या बाबतीतसुद्धा हेच झालं आहे. काँग्रेसचे धीरज लिंगाडे आणि भाजपाचे विद्यमान आमदार रंजित पाटील यांचा अमरावती पदवीधर मतदार संघातील पदवीधरांशी काडीचाही संबंध आला नाही.
मात्र वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल अमलकार हे गेल्या कित्येक वर्षांपासून अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यातील पदवीधरांच्या प्रश्नांसाठी नेहमी आवाज उठवत असल्याकारणाने तरुणांमध्ये त्यांची अधिक लोकप्रियता वाढलेली आहे.
परिणामी येत्या ३० जानेवारी २०२३ ला सोमवार रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अनिल अमलकरांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी असल्याची चर्चा सर्वीकडे सुरु आहे.
©copyright politicalwazir.in