टिपू सुलतान आम्हाला मान्य नाही- भाजप

           मंडळी सध्या भारतीय जनता पक्ष आणि राज्य सरकारमध्ये टिपू सुलतान यांच्यावरून चांगलीच वादावादी पेटली आहे. मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानच नाव देण्यावरून भाजपासोबतच बजरंग दलानेसुद्धा या वादामध्ये स्वतःला सामील केलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच भारतीय जनता पक्ष आणि बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी केली. यादरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच वादावादी झाल्याचं दिसून आलं.

            विरोधीपक्षनेते व माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या टिपू सुलतान यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर खासदार संजय राऊत यांनी सुद्धा अखेर आपले मौन सोडले. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की भारतीय जनता पक्ष क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याला विरोध करत असेल आणि राजीनाम्याची गोष्ट करत असेल तर त्यांनी सर्वात आधी मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यायला हवा. कारण कर्नाटकमधल्या विधानसभेत रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतान यांचा गुणगौरव केला होता. 

टिपू सुलतान हिंदूंवर अत्याचार करणारा राजा- देवेंद्र फडणवीस

     मंडळी भारतीय जनता पक्षाला नेहमीच मुस्लिम द्वेष राहला आहे .भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या टिपू सुलतान विरोधात केलेल्या विधानावरून याच ज्वलंत उदाहरण दिसून आलं. मालाडमधल्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानच नाव देण्यावरून सुरू असलेला वाद भारतीय जनता पक्षाने चांगलाच उचलून धरला आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस यांचा टिपू सुलतानबद्दल असलेला द्वेष स्पष्ट दिसून आला.

           \”टिपू सुलतानने नेहमी हिंदूंवर अत्याचार केले व त्यांचा छळ केला\”,अस प्रसार माध्यमांशी बोलत असतांना ते सांगत होते. मात्र यावर प्रतिउत्तर देतांना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की , \” टिपू सुलतान यांनी कोणता अन्याय केला, काय अत्याचार केला, ब्रिटिशांशी कसा लढा दिला हा सगळा इतिहासा आम्हाला माहीत आहे. ते राज्यसरकारला सांगायची गरज नाही. भारतीय जनता पक्षाने इतिहासाची ठेकेदारी घेऊ नये,\” अस संजय राऊत यांनी म्हटलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *