अंतिम निकाल आणि एक्झिट पोल; भविष्य आणि वास्तविकता.

अंतिम निकाल आणि एक्झिट पोल; भविष्य आणि वास्तविकता.

२०२४ च्या लोकसभा निवडणुका आज ०१ जुनला संध्याकाळी ०६ वाजता संपतील आणि संपुर्ण निवडणूकांचा अंदाज घेऊन लोकसभेत कोण बाजी मारेल या साठी यासाठी एक्झिट पोल प्रसारित करणाऱ्या मोठमोठ्या संस्थांमध्ये स्पर्धा सुरू होईल.

परंतू एक्झिट पोल चा अंदाज योग्य असतो का? असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होतो त्या साठी मागील निवडणुकीचा अधार घेऊन एक्झिट पोल आणि वास्तविक निकाल याचा आढावा घेवूयात.

एक्झिट पोल हा प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास करून मतदारसंघाची स्थिती, मतदानाचे प्रमाण, उमेदवरांची छबी आणि मागील निवडणूकीचा निकाल अशा विविध पैलू च्या आधारे प्रसारित केला जातो. एक्झिट पोल हा योग्य ठरेल असे नक्की सांगता येत नाही एक्झिट पोल म्हणजे निकाल पूर्व लावलेला एक अंदाज असतो.

२०२४ च्या निवडणुकीचा एक्झिट पोल शेवटच्या टप्यातील मतदान संपल्या नंतर ३० मिनिटांनी म्हणजेच ०६:३० वाजल्या पासून प्रसारित केले जातील. परंतू सर्व ५४३ संसदीय जगांसाठीचे वास्तविक निकाल भारताच्या केंद्रीय निवडणुक आयोगाकडून ०४ जुन रोजी प्रसारित केले जातील.

२०१४ मध्ये बहुतेक एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखाली NDA सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त केला होता परंतू विजयाचा अचूक अंदाज लावण्यात एक्झिट पोल अपयशी ठरले होते. २०१४ मध्ये विविध संस्था द्वारे प्रसारित केलेले एक्झिट पोल आणि वास्तविक निकाल यांच्या आकडे मधला फरक खालील प्रमाणे आहे.

एक्झिट पोल प्रसारित करणाऱ्या काही संस्था आणि त्यांचे एक्झिट पोल.

१) इंडिया टुडे- NDA-२७२ आणि UPA-११५

२) न्यूज २४ – NDA-३४० आणि UPA-१०१

३) CNN- IBN – NDA-२८० आणि UPA-९७

४) टाईम्स नाऊ -NDA-२४९ आणि UPA-१४८

५) ए बी पी न्यूज -NDA-२७४ आणि UPA-९७

६) एन.डी टीव्ही -NDA-२७९ आणि UPA-१०३

हि एक्झिट पोलची आकडेवारी होती वास्तविक निकाल मध्ये
NDA- ३३६ जागा जिंकल्या होत्या
UPA -६० जागा जिंकल्या होत्या

एकट्या भाजपने या निवडणुकीत २८४ जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या

एक्झिट पोल नुसार सरकार जरी भाजपच्या नेतृत्वखाली NAD चे सत्तेत आले असले तरी एक्झिट पोल आणि वास्तविक निकाल यामध्ये बराच फरक दिसुन येतो.

२०१९ मध्ये सुध्दा एक्झिट पोल आणि वास्तविक निकाल या मध्ये बराच फरक दिसुन आलता.

१) इंडिया टुडे – NDA-३३९-३६५ आणि UPA -७७-१०८

२) न्यूज २४ – NDA-३५० आणि UPA-९५

३) न्यूज १८- NDA-३३६ आणि UPA-८२

४) टाईम्स नाऊ- NDA-३०६ आणि UPA-१३२

५) इंडिया टीव्ही- NDA-३०० आणि UPA-१२०

६) सुदर्शन न्यूज- NDA-३०५ आणि UPA-१२४

हि २०१९च्या एक्झिट पोलची आकडेवारी होती वास्तविक निकाल मध्ये
NDA-३५२ जागा जिंकल्या होत्या
UPA -९१ जागा जिंकल्या हित्या

एकट्या भाजपने या निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या होत्या.

परंतू २०२४ च्या निवडणूकीत देशातले राजकीय समीकरण पूर्ण बदलले आहेत. भाजप सरकारवर जनता नाराज आहे. वाढती बेरोजगारी, महागाई याचा भाजपला फटका बसेल असा अंदाज आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील INDIA यांच्यात थेट लढत झाली. सत्ताधारी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवू पाहत आहे. भाजपने एनडीएसाठी “400 पार” जागांचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. तर सविंधानाच्या रक्षणासाठी आणि महागाई साठी बचाव सामान्य जनतेच्या बाचावा साठी काँग्रेस च्या नेतृत्वाखाली INDIA निवडून लढवताना दिसत आहे.

थोडक्यात मागील निकालांचा विचार केला आणि बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर एक्झिट पोल च्या आधारे सत्तेत कोण येईल याचा अंदाज येवू शकतो परंतू कोण किती जागा जिंकेल याचा अंदाज येणं कठीण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *